मुंबई

Mumbai News : वरळीत धडक! आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातून महायुती फुंकणार प्रचाराचे रणशिंग; ‘नारळ’ फोडण्यासाठी मुद्दाम ‘एनएससीआय’ची निवड

मुंबईच्या सत्तेसाठी ‘आरपार’ची लढाई: ठाकरेंची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी फडणवीस-शिंदे यांची जोडी मैदानात; उद्या वरळीच्या घुमटात महायुतीची पहिली गर्जना!

मुंबई | मुंबई महानगरपालिकेच्या (BMC Election 2026) राजकारणात ज्या बालेकिल्ल्याने ठाकरेंना नेहमीच साथ दिली, त्याच वरळीच्या भूमीत शिरून महायुतीने (भाजप-शिवसेना शिंदे गट) परिवर्तनाचे रणशिंग फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या शनिवारी, दक्षिण मुंबईतील आदित्य ठाकरे यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या वरळीत महायुतीच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ होणार आहे. वरळीच्या ऐतिहासिक एनएससीआय (NSCI) डोम मध्ये होणाऱ्या या विराट सभेने मुंबईतील सत्तेचा संघर्ष आता एका नव्या आणि निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे.

‘वरळी’च का? रणनीतीमागील मोठे कारण

वरळी, दादर, परळ आणि माहिम हा पट्टा म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला. याच ‘कोअर’ भागात ठाकरे गटावर मात करण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे. मुंबई महापालिकेवरील ठाकरेंची कित्येक दशकांची मक्तेदारी मोडीत काढणे, हाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुख्य अजेंडा आहे. त्यामुळेच प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी वरळीसारख्या आव्हानात्मक मतदारसंघाची निवड करण्यात आली असून, “आम्ही तुमच्या घरात येऊन तुम्हाला हरवणार,” असा रोखठोक संदेश यातून दिला जात आहे.

‘अस्तित्व’ विरुद्ध ‘प्रतिष्ठा’

ही निवडणूक केवळ महापालिकेची नसून ती अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन आपले अस्तित्व टिकवण्यासाठी जोर लावला असतानाच, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मुंबईतून ठाकरेंना हद्दपार करण्याचा विडा उचलला आहे. मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) सर्व महापालिका काबीज करण्याचा निर्धार करत, दोन्ही नेत्यांनी एका दिवसात किमान 3 ते 4 सभा घेण्याचे नियोजन केले आहे.

महाप्रचाराचे स्वरूप आणि ‘मिशन मुंबई’

शनिवारी संध्याकाळी होणाऱ्या या सभेत फडणवीस आणि शिंदे यांच्या तोफा धडाडणार आहेत. या सभेसाठी विशेष ‘एनएससीआय डोम’ची निवड करण्यात आली आहे, जिथे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महायुतीचा ‘विजयाचा संकल्प’ जाहीर केला जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रचारादरम्यान महायुतीचे नेते एकमेकांवर टीका करण्याऐवजी पूर्णपणे महाविकास आघाडीवर हल्लाबोल करणार आहेत. जिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती आहे, तिथे तिन्ही नेते एकत्रित ताकद दाखवणार आहेत.

आदित्य ठाकरेंना बालेकिल्ल्यातच घेरले

वरळी हा आदित्य ठाकरेंचा स्वतःचा मतदारसंघ असल्याने, तिथेच महायुतीचा शुभारंभ होणे ही त्यांच्यासाठी मोठी चिंतेची बाब ठरू शकते. मुंबईचा पुढचा महापौर हा महायुतीचाच असेल, हा आत्मविश्वास मतदारांमध्ये रुजवण्यासाठी वरळीतील या सभेचे नियोजन अत्यंत सूक्ष्म पद्धतीने करण्यात आले आहे. आता उद्याच्या सभेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुंबईकरांसाठी कोणत्या ‘मोठ्या घोषणा’ करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

43 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago