मुंबई

Mumbai News : मुंबई महापालिकेत शिंदेंचा ‘मास्टरस्ट्रोक’! अभ्यासू अमेय घोलेंकडे शिवसेनेचे सारथ्य; सत्तेच्या गणितासाठी महायुतीची ‘कोकण भवन’मध्ये मोठी खेळी

Mumbai BMC News : देवेंद्र फडणवीसांचा ‘मास्टरस्ट्रोक’; स्थायी समितीवरील वर्चस्वासाठी भाजप आणि शिवसेनेची रणनीती यशस्वी

मुंबई | मुंबई महानगरपालिकेच्या Mumbai BMC महापौरपदाचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात आला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या सत्तेत आपली पकड मजबूत करण्यासाठी अत्यंत अनुभवी आणि ‘युवा’ चेहरा मैदानात उतरवला आहे. शिवसेनेच्या 29 नगरसेवकांचे नेतृत्व करण्यासाठी अभ्यासू नगरसेवक अमेय घोले यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली असून, महायुतीने आज मुंबईच्या तिजोरीची चावी मानल्या जाणाऱ्या ‘स्थायी समिती’वर ताबा मिळवण्यासाठी ‘मॅथेमॅटिकल’ फिल्डिंग लावली आहे. Mumbai Political News

शिवसेनेतील एक अत्यंत संयमी आणि प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव असलेला चेहरा अशी अमेय घोले यांची ओळख आहे. सलग तीन टर्म नगरसेवक राहिलेल्या घोलेंकडे गटनेतेपद सोपवून शिंदेंनी मुंबईत आपला प्रभाव कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आज सकाळी 10 वाजता मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा मेळा जमला आणि तेथून हे सर्वजण एकत्रितपणे ‘कोकण भवन’कडे गटनोंदणीसाठी रवाना झाले.

देवेंद्र फडणवीसांची ‘पॉवर प्ले’ आणि ठाकरे गटाची कोंडी

या संपूर्ण प्रक्रियेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावलेली फिल्डिंग महत्त्वाची ठरली आहे. ठाकरे गटाच्या 65 नगरसेवकांना रोखण्यासाठी महायुतीने स्वतःची ताकद दोन गटांत विभागली आहे. भाजपने आपले 89 नगरसेवक स्वतंत्र नोंदवले आहेत, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या 29 नगरसेवकांची एकत्र गटनोंदणी केली आहे. या तांत्रिक खेळीमुळे महायुतीचा स्थायी समितीतील आकडा एकाने वाढणार असून, कोणत्याही महत्त्वाच्या प्रस्तावावर विरोधकांची कोंडी करणे सत्ताधाऱ्यांना सोपे होणार आहे.

vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

16 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

16 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

21 hours ago