Mumbai News : मुंबई मनपा निवडणुकीसाठी राज ठाकरेंची मोर्चेबांधणी: मनसेत आठ नव्या विभागप्रमुखांची नियुक्ती

Mumbai Breaking News : उत्तर भारतीय, गुजराती प्राबल्याच्या मतदारसंघातही मनसेने दिला पदाधिकाऱ्यांना संधी
मुंबई: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी कंबर कसली असून, जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून शनिवारी त्यांनी पक्षाच्या आठ नव्या विभागप्रमुखांची नियुक्ती केली आहे. या नव्या दमाच्या पदाधिकाऱ्यांच्या जोरावर राज ठाकरे मुंबई महापालिकेत पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करणार आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये गुजराती आणि उत्तर भारतीयांचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघांतही पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. MNS Latest News

या व्यतिरिक्त, कुर्ला विधानसभा विभाग अध्यक्षपदी प्रदीप वाघमारे, अणुशक्ती नगर विधानसभा अध्यक्षपदी रवींद्र शेलार, भांडुप विधानसभा विभाग अध्यक्षपदी अनिल पंडित राजभोज आणि मलबार हिल विधानसभा विधाग अध्यक्षपदी दिनेश पुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या केंद्रीय समितीला अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांच्या जागी नव्या कार्यकर्त्यांची निवड करण्याची सूचना दिली होती, त्यानुसारच या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, मनसेने उद्या (रविवार) रंगशारदा सभागृहात होणारा आपला मेळावा अचानक रद्द केला आहे. पक्ष संघटनेतील बदल प्रक्रियेमुळे हा मेळावा लांबणीवर टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या मेळाव्याची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.


