•राम मंदिर रेल्वे स्थानकावर मध्यरात्री 1.25 च्या सुमारास घडली थरारक घटना; विकास बेद्रे या तरुणाने दाखवले अपवादात्मक धैर्य
मुंबई :- मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेसाठी कालची (बुधवारची) रात्र अत्यंत संस्मरणीय आणि जीवघेणी ठरली. गोरेगाव रेल्वे स्थानकावरून प्रवास करत असताना, धावत्या लोकलमध्ये एका गर्भवती महिलेला तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. मात्र, यावेळी विकास दिलीप बेद्रे नावाच्या एका तरुणाने दाखवलेले समयसूचकता आणि धैर्य यामुळे राम मंदिर रेल्वे स्थानकावर मध्यरात्री एका गोंडस बाळाचा जन्म झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 12.40 च्या सुमारास लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या या महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. मदतीसाठी ती ओरडत असताना, विकास बेद्रे या तरुणाने तात्काळ ट्रेनची इमर्जन्सी चेन ओढली, ज्यामुळे लोकल राम मंदिर रेल्वे स्थानकावर थांबली.
डॉक्टर मैत्रिणीचा ‘व्हिडिओ कॉल’ ठरला वरदान
राम मंदिर स्थानकावर तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध नसल्याचे पाहून विकासने तात्काळ आपली डॉक्टर मैत्रिण देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल केला. मध्यरात्रीची वेळ असूनही डॉ. देविका यांनी माणुसकीच्या नात्याने कॉल उचलला आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखले.
त्यानंतर डॉ. देविका यांनी व्हिडिओ कॉलवर शांतपणे, स्टेप-बाय-स्टेप प्रसूतीची संपूर्ण प्रक्रिया विकासला समजावून सांगितली. विकास बेद्रे याला वैद्यकीय शिक्षणाचा किंवा प्रसूतीचा कोणताही अनुभव नसतानाही, डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रत्येक सूचनांचे त्याने तंतोतंत पालन केले. त्याच्या या अफाट धैर्य आणि संयमामुळे रात्री सव्वा एक ते दोनच्या दरम्यान महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला!
बाळाच्या रडण्याच्या आवाजाने उपस्थित प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने त्वरित आई आणि बाळाला पुढील वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या दोघांचीही प्रकृती सुखरूप आहे.विकास बेद्रे आणि डॉ. देविका देशमुख यांच्या तात्काळ माणुसकीच्या प्रतिसादाने एका जीवाला नवसंजीवनी मिळाली असून, त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…