मुंबई

Mumbai News : मुंबईत ‘नवाब’च मालिक! भाजपचा विरोध झुगारून अजित पवार मलिकांच्याच नेतृत्वात उतरणार

Mumbai Latest Political News : सना मलिकांचे आशिष शेलारांना चोख प्रत्युत्तर; मुंबईत ‘स्वबळा’चे वारे, महायुतीत पेच वाढला

मुंबई | मुंबई महानगरपालिका Mumbai BMC Election निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. भाजपचा तीव्र विरोध आणि अटी झुगारून देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत माजी मंत्री नवाब मलिक Mumbai Nawab Malik यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे खरे ‘मालिक’ नवाब मलिकच असल्याचे स्पष्ट झाले असून, भाजपासोबतच्या युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. Mumbai Political Latest News

सना मलिकांचा शेलारांवर पलटवार भाजप नेते आशिष शेलार यांनी नवाब मलिकांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीशी युती करण्यास नकार दिला होता. याला नवाब मलिक यांच्या कन्या आमदार सना मलिक यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. “आरोप झाले म्हणजे कुणी गुन्हेगार ठरत नाही. आशिष शेलार स्वतः वकील असूनही ‘गुन्हा सिद्ध होईपर्यंत प्रत्येक व्यक्ती निर्दोष असते’ या संविधानातील तत्त्वाचा त्यांना विसर पडला आहे का?” असा खोचक सवाल सना मलिक यांनी उपस्थित केला आहे.

भाजपची कोंडी: माघार घेणे अशक्य तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांवर देशद्रोही लोकांशी संबंध असल्याचा आरोप केला होता. याच आरोपांमुळे मलिकांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. आता निवडणुकीच्या तोंडावर मलिकांशी हातमिळवणी करणे भाजपसाठी राजकीयदृष्ट्या आत्मघातकी ठरू शकते. मुंबईतील मतदारांसमोर आपली प्रतिमा जपण्यासाठी आशिष शेलार आणि स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी मलिकांच्या नावाला कडाडून विरोध केला आहे.

अजित पवारांचा ‘प्लॅन बी’ तयार?

दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पार पडलेल्या तीन तासांच्या मॅरेथॉन बैठकीनंतर राष्ट्रवादीने (अजित पवार गट) दोन स्वतंत्र अहवाल तयार केले आहेत. 1. युती झाल्यास: जागावाटपाचा सन्मानजनक फॉर्म्युला काय असावा?2.युती न झाल्यास: मुंबईत ‘स्वबळावर’ लढण्याची तयारी कशी असेल? हे दोन्ही अहवाल लवकरच अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर ठेवले जाणार आहेत.

रणनीती: सना मलिक ‘ॲक्टिव्ह मोड’मध्ये निवडणुकीसाठी उमेदवारांच्या मुलाखती आणि अर्जांची छाननी स्वतः नवाब मलिक करत आहेत. मात्र, प्रत्यक्ष प्रचाराच्या मैदानात आणि रणनीती ठरवताना नवाब मलिक यांच्याऐवजी त्यांच्या कन्या आमदार सना मलिक या अधिक सक्रिय दिसणार आहेत. मुस्लिम बहुल भागांत सना मलिकांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.

मतांच्या विभाजनाचे गणित?

राजकीय विश्लेषकांच्या मते, मुंबईत अजित पवार गट स्वतंत्र लढणे ही भाजपची एक छुपी रणनीती देखील असू शकते. अणुशक्तीनगर आणि वांद्रे यांसारख्या मुस्लिमबहुल भागांत राष्ट्रवादीने स्वतंत्र उमेदवार दिल्यास दलित-मुस्लिम मतांचे विभाजन होईल. याचा थेट फटका उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेसला बसू शकतो, ज्याचा फायदा भाजप-शिंदेसेनेला मिळण्याची शक्यता आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

7 hours ago