क्राईम न्यूजमुंबई

Mumbai Police : मुंबई पोलिसांचं ‘ऑपरेशन मुस्कान’!

Mumbai Police Operation Muskan : ऑपरेशन मुस्कान ही हरवलेल्या मुलाना शोधून त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यासाठी राबवली जाणारी एक मोहिम आहे. मुंबई पोलीस डिसेंबर महिन्यात ऑपरेशन मुस्कानाची 13 वी मोहीम राबविणार

मुंबई :- मुंबई पोलिसाची Mumbai Police आणि राज्यातील पोलिसांची Maharashtra Police कामगिरीचे जगभरात कौतुक केलं जातं. मुंबई पोलीस ही जगभरातील तिसऱ्या क्रमांकावरील पोलीस यंत्रणा असल्याचे म्हटले जाते. मुंबई पोलिसांची तुलना जगभरातील प्रथम दोन क्रमांकावरील पोलीस यंत्रणे बरोबर केली जात असल्याचे आपण वेळोवेळी माहिती पाहिली आहे. अशीच एक चांगली कामगिरी पुन्हा समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी पुढील महिनाभर म्हणजेच 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत शहर आणि उपनगरात ऑपरेशन मुस्कान Mumbai Police Operation Muskan 13 मोहीम राबवून हरवलेल्या बालकांचा तर बालमजुरांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात देणार आहे. मुंबई पोलीस वेळोवेळी शहर आणि उपनगरात ऑपरेशन मुस्कान राबवून हरवलेल्या बालकांचा शोध घेत असतात. त्यानुसार डिसेंबर महिन्यात पोलिसांनी हे ऑपरेशन राबविणार आहे. Mumbai Police Latest News

ऑपरेशन मुस्कान ही हरवलेल्या मुलाना शोधून त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यासाठी राबवली जाणारी एक मोहिम आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ही मोहिम राबवली जाते. मुंबई हे मेट्रो प्लेटिंग शहर असल्या कारणाने इथे मोठ्याप्रमाणे अशा घटना घडतात. त्यासाठी मुंबईमध्ये ऑपरेशन मुस्कान डिसेंबर महिन्यात राबवली जाणार आहे. Mumbai Police Latest News

पोलिसांकडून आवाहन

कोणताही संशयीत लहान मुलगा/मुलगी मिळून आल्यास त्यांच्याकडे चौकशी करावी व काही संशयीत वाटल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षास 100 अगर 1098 या क्रमांकावर कळवावे अगर लगतच्या पोलीस ठाणेशी संपर्क साधावा अगर सदर बालकास तात्काळ जवळच्या पोलीस ठाणेस घेवून जावे

1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत रेल्वे स्थानके, बसस्थानके, रस्त्यावर भिक मागणारी अथवा कचरा गोळा करणारी लहान मुले/मुली, धार्मिकस्थळे, रुगणालये, हॉटेल्स, दुकाने इत्यादी ठिकाणी काम करणारी लहान मुले/मुली मिळून आल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षास 100 या क्रमांकावर कळवावे अगर लगतच्या पोलीस ठाणेशी संपर्क साधावा,

आपण रहात असलेल्या परिसरामध्ये लहान मुले/मुली काम करीत असल्याचे मिळून आल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षास 100 अगर 1098 या क्रमांकावर कळवावे अगर लगतच्या पोलीस ठाणेशी संपर्क साधावा.

•रेल्वे स्टेशन बाहेरील परिसर / बस स्टेशन बाहेरील परिसर या ठिकाणी बेवारस स्थितीत लहान मुले/मुली मिळून असल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षास 100 अगर 1098 या क्रमांकावर कळवावे अगर लगतच्या पोलीस ठाणेशी संपर्क साधावा.

•आपल्या राहत्या परिसरात नातेवाईकांकडे राहणारी लहान मुले यांचेबाबत काही संशय असल्यास त्याबाबाबत तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षास 100 अगर 1098 या क्रमांकावर कळवावे अगर लगतच्या पोलीस ठाणेशी संपर्क साधावा.

•एखादा अल्पवयीन मुलगा/मुलगी संशयीत वाटल्यास त्याबाबत https://missionvatsalva.wed.gov.in या बेवसाईटवर जावुन khoya paaya या पोर्टलवर मुलगा/मुलीचा फोटो अपलोड करावा.

•आपल्या आजुबाजुच्या परिसरामध्ये कोणी लहान मुलगा/मुलगी घरकाम करताना मिळुन आल्यास त्याबाबत तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षास 100 अगर 1098 या क्रमांकावर कळवावे अगर लगतच्या पोलीस ठाणेशी संपर्क साधावा,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0