मुंबई
Trending

Mumbai News : “शिळ्या डाळीवरून आमदार संतापले… कानशिलात लगावली!”

MLA Sanjay Gaikwad : मंत्रालयाजवळील आमदार निवासातील उपहारगृहात कर्मचाऱ्याला मारहाण – आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात Marine Drive पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई | राज्याच्या राजकारणात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शिवसेना (शिंदे गटाचे) आमदार संजय गायकवाड यांनी मंत्रालयाजवळील आकाशवाणी आमदार निवासातील उपहारगृहात एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात Marine Drive Police Station स्वतःहून तक्रार दाखल करत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मंगळवारी रात्री गायकवाड यांनी उपहारगृहातून जेवण मागवले होते. डाळ शिळी असून त्यामधून दुर्गंधी येत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. कर्मचाऱ्याने समाधानकारक उत्तर न दिल्याचा आरोप करत, गायकवाड यांनी कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावून, बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे संजय गायकवाड हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

मरिन ड्राईव्ह पोलिसांनी स्वतः तक्रार नोंदवत, आमदार संजय गायकवाड आणि त्यांच्या सोबत असलेल्या अजून एका व्यक्तीवर खालील कलमांखाली अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.कलम 115 (2),कलम 352,कलम 3(5) गुन्हा मिल्स स्पेशल पोलिसांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाची दणका विधान परिषदेतही जाणवला. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी हे प्रकरण सभागृहात उपस्थित करत म्हणाले,“कर्मचाऱ्याला मारण्याऐवजी हिंमत असेल तर मंत्र्याला मारा! असे लोकप्रतिनिधी चालणार नाहीत. अशा आमदारांचे निलंबन करा!”

त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले,“काहीतरी अन्न खराब झाले होते, दुर्गंधी येत होती – हे मान्य. पण लोकप्रतिनिधीने मारहाण करणे ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. अशा वर्तनामुळे समाजात चुकीचा संदेश जातो.”

गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की,“मी याआधीही दोन-तीन वेळा उपहारगृहातील अन्नाविषयी तक्रार केली होती. या वेळी डाळ खूपच वाईट होती. राग अनावर झाला.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0