महाराष्ट्र
Trending

Mumbai News : बळीराजाला ‘मुंबईच्या राजा’चा मदतीचा हात! गणेशगल्लीच्या लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 5 लाखांची मदत

Mumbai Latest News : पूर आणि अतिवृष्टीने हतबल झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी धावले मुंबईतील मंडळे आणि देवस्थाने

मुंबई :- राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पूर आला असून, सर्वाधिक फटका बळीराजाला बसला आहे. दुष्काळाच्या छायेखाली हतबल झालेल्या मराठवाड्यातील शेतकरी आणि नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी आता मुंबईतील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळे आणि महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थाने पुढे सरसावली आहेत.

मुंबईतील गणेशगल्ली येथील लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने (‘मुंबईच्या राजा’ने) राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या मंडळाने यापूर्वीही महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत केली आहे.

मंदिरे आणि मंडळांकडून मदतीचा महापूर

मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेतातील पीक आणि जनावरे वाहून गेल्याने मोठे संकट उभे राहिले आहे. या संकटात आधार देण्यासाठी राज्य शासनाने मदत जाहीर केली असतानाच, अनेक संस्थांनीही मदतीचा हात पुढे केला आहे.

मुंबईतील सिद्धिविनायक ट्रस्टने महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी 10 कोटी रुपये मदत घोषित केली आहे.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानेही 50 लाख रुपये मदत देण्याचे घोषित केले आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानांपैकी शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानातर्फे 1 कोटी 11 लाख रुपये देण्यात आले आहेत.

तुळजाभवानी मंदिराने 1 कोटी रुपये मदत दिली असून, पूरग्रस्त महिलांसाठी 1000 साड्या वाटप करण्याचीही घोषणा केली आहे.

शिर्डी साईबाबा संस्थानानेही पूरग्रस्तांसाठी 1 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

सरकारची मदत आणि सामाजिक आधार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने 2,215 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून अतिरिक्त मदतीची तरतूद केली जात आहे. याचबरोबर समाजातील अन्य विविध घटकही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. यामध्ये पारलिंगी समुदायाने (तृतीयपंथी) चक्क जोगवा मागून शेतकऱ्यांसाठी निधी उभारण्याचा प्रयत्न केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0