Mumbai News : पोलीस सह आयुक्त यांची बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई
•Mumbai Police took action against rickshaw drivers भाडे नाकारणा-या 32 हजार 658 रिक्षा चालकांवर कारवाई
मुंबई :- रेल्वे स्थानके, मॉल, बस स्थानके व इतर ठिकाणी रिक्षा चालक हे लांब पल्ल्याचे भाडे मिळविण्याकरीता बऱ्याच वेळा नजिकचे भाडे नाकारित असल्याच्या आणि चालक गणवेश परिधान न करणे, बॅच व इतर कागदपत्रे न बाळगणे इत्यादीबाबत नागरिकांकडून प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने वाहतूक नियंत्रण शाखा मुंबई मार्फत अशा बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करण्यासाठी दिनांक 8 एप्रिल ते दिनांक 22 एप्रिल रोजी पर्यंत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. Mumbai News
सदर विशेष मोहिमेदरम्यान एकुण 52 हजार 218विविध शिर्षाखाली रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये विशेषतः भाडे नाकारणे या शिर्षाखाली 32 हजार 658 विना गणवेश 5 हजार 238 जादा प्रवासी वाहतूक करणे 8 हजार 650 व इतर कारवाई 5 हजार 613असे एकूण 52 हजार 189 ई-चलान करवाई करण्यात आली आहे. भाडे नाकारणाऱ्या 32 हजार 658 वाहनांचे परवाने निलंबित करण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. Mumbai News