• महायुती बहुमताच्या उंबरठ्यावर; मुंबई, ठाणे आणि कल्याणमध्ये सत्तास्थापनेचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार
मुंबई | मुंबई महानगरपालिकेच्या ऐतिहासिक निकालांनंतर आता सत्तेचा सारीपाट मांडला जात आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने 114 हा बहुमताचा आकडा पार करत मुंबईवर महायुतीचा भगवा फडकवण्याची तयारी पूर्ण केली आहे. या सत्तास्थापनेत केवळ पदे वाटून घेतली जाणार नाहीत, तर मुंबईच्या विकासाचा एक नवा ‘रोडमॅप’ तयार करण्यावर दोन्ही पक्षांनी शिक्कामोर्तब केले आहे.
महायुतीचा संभाव्य सत्तेचा फॉर्म्युला: कोणाला काय मिळणार?
भाजप हा 89 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरल्याने, पहिल्या टर्मसाठी ‘भाजपचा महापौर’ बसवण्यावर जवळपास एकमत झाले आहे. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपल्या 29 जागांच्या बळावर ‘अडीच-अडीच वर्षे’ महापौरपद मिळावे, असा आग्रह धरल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, वाटाघाटींचा जो फॉर्म्युला चर्चेत आहे तो असा असू शकतो:
भाजप: महापौर पद (पहिली अडीच वर्षे), सुधार समिती, बेस्ट (BEST) आणि आरोग्य समिती.
शिंदे सेना: स्थायी समिती अध्यक्षपद (मुंबई महापालिकेची तिजोरी), शिक्षण समिती, विधी आणि बाजार समिती.शिंदे गटाला स्थायी समिती देऊन महायुतीत समतोल राखण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
मनसेचा ‘कल्याण पॅटर्न’ मुंबईत चालणार?
कल्याण-डोंबिवलीत मनसेच्या 5 नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा देऊन राजकीय भूकंप घडवून आणला आहे. आता मुंबईतील मनसेचे 6 नगरसेवक काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. राज ठाकरे यांनी अद्याप पत्ते उघड केले नसले तरी, “शहराच्या विकासासाठी आणि राजकीय स्थिरता राखण्यासाठी” मनसे महायुतीला बाहेरून पाठिंबा देण्याची किंवा सत्तेत सहभागी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनसेची साथ मिळाल्यास महायुतीचे संख्याबळ 124 वर पोहोचेल, ज्यामुळे सत्ता अधिक स्थिर होईल.
महापौर आरक्षणाने फिरवली गणिते राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले. मुंबईचे महापौरपद ‘खुल्या प्रवर्गातील महिला’ उमेदवारासाठी राखीव झाले आहे. या आरक्षणामुळे ठाकरे गटाच्या आशांना धक्का बसला असला, तरी महायुतीतील महिला नगरसेविकांमध्ये आता महापौरपदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे.
बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीचे भावनिक कार्ड दुसरीकडे, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी “बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात शिवसेनेचाच महापौर व्हावा” असे आवाहन करत मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, “मुंबईचा विकास हाच आमचा अजेंडा असून महायुतीचाच महापौर बसणार,” असे ठाम उत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
•पोयसरमधील घरफोडी प्रकरणी मुख्य आरोपी गजाआड; छताचा पत्रा उचकटून केला होता डल्ला; सर्व मुद्देमाल जप्त…
Thackeray Members On Kishori Pednekar : माजी महापौर, स्थायी समिती अध्यक्षांना डावलल्याची चर्चा; 65 नगरसेवक…
•रायपूरमध्ये विक्रमी पाठलाग; सूर्याचे 467 दिवसांनंतर अर्धशतक, तर इशानची न्यूझीलंडविरुद्ध सर्वात वेगवान फिफ्टी; 5 सामन्यांच्या…
Uddhav Thackeray On BJP Member : ठाकरे बंधूंच्या व्यासपीठावरून फुंकले लढाईचे रणशिंग; "गद्दारांची जागा निष्ठावंत…
Kandivali SamtaNagar Police Latest News : पोयसरमधील घरफोडी प्रकरणी मुख्य आरोपी गजाआड; छताचा पत्रा उचकटून…
•ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर; राज यांच्या 'फॅमिली डॉक्टर'च्या किस्स्याने सभागृहात हास्यकल्लोळ; शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या…