Ramesh Kir : काँग्रेसच्या विधान परिषदेच्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा पाठिंबा

•कोकण पदवीधर मतदार मतदारसंघातून विधान परिषदे करिता काँग्रेसचे अधिकृत उमेदवार Ramesh Kir यांना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून पाठिंबा
ठाणे :- काँग्रेस पक्षाने कोकण पदवीधर मतदार संघातून विधान परिषदे करिता रमेश कीर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांना घोषित करण्यात आले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांना घोषित करण्यात आले आहे. त्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी रमेश कीर जाहीर पाठिंबा दिला आहे. रमेश कीर यांची लढत भाजपाचे अधिकृत उमेदवार निरंजन डावखरे यांच्यासोबत आहे. निरंजन डावखरे यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
रमेश कीर हे काँग्रेसचे कार्यकर्त्यांपासून अनेक वर्षांपासून विविध पदावर काम करत आहे. त्यांनी कोकण म्हाडा, महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी व शिक्षण क्षेत्रातील संबंधित विविध पदावर काम केले आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, सर्व पदवीधर मतदारांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार असलेले रमेश कीर यांना प्रचंड मताने विजयी करा तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रमेश केरळ यांचा प्रचार करून त्यांना निवडून आणण्याकरिता सर्वातोपरी मदत करूया असे आवाहन कोकण विभागातील कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे. 26 जून 2024 रोजी मतदान होणार आहे, तर 1 जुलैला मतमोजणी होणार आहे.