मुंबई

Mumbai News : मुसळधार पावसात गिरगावात रस्ता खचला; बस अडकली, प्रवाशांची धांदल

•मेट्रो-3 च्या कामाजवळ रस्त्याचा भाग कोसळला; बेस्ट बसचे चाक खड्ड्यात

मुंबई | सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली असतानाच गिरगाव परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला. मेट्रो लाईन-3 च्या कामाजवळील रस्त्याचा भाग अचानक खचल्याने त्या ठिकाणी जात असलेली बेस्टची बस अडकली. परिणामी प्रवाशांना बसमधून उतरून बाहेर पडावे लागले, तर वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली.

ठाकूरद्वार चौकाजवळ, डॉ. बाबासाहेब जयकर मार्गावर सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. मेट्रो-3 अंतर्गत सुरू असलेल्या गिरगाव स्थानकाच्या कामाजवळ बॅरिकेड्स शेजारीच हा रस्ता खचला. त्याच वेळी त्या मार्गाने जात असलेल्या बसचे मागचे चाक खड्ड्यात अडकले. बस रस्त्यावरच तिरकी स्थितीत अडकून पडल्याने अन्य वाहनांचीही वाहतूक विस्कळीत झाली.

मुंबईत पावसाने रविवारी रात्रीपासून जोर धरला असून सोमवारी सकाळपासूनच पावसाचा जोर अधिक जाणवू लागला आहे. अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले असून वाहतूक आणि प्रवासी दोघेही यामुळे त्रस्त झाले आहेत.

vivek

Recent Posts