क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Mumbai News : सत्र न्यायालयाचा कठोर दंड! खुनी हल्ल्याच्या आरोपींना 8 वर्षे, तर बालिकेवरील बलात्काऱ्याला 10 वर्षे सक्त मजुरी

Mumbai Police Latest News : देवनार आणि चेंबूर पोलीस ठाण्यातील दोन गंभीर गुन्ह्यांमध्ये न्यायमूर्तींची ठोस भूमिका; मुंबई पोलिसांची कोर्ट पैरवी यशस्वी.

मुंबई :- मुंबई पोलिसांनी पाठपुरावा केलेल्या दोन गंभीर गुन्ह्यांमध्ये सत्र न्यायालयाने आरोपींना कठोर शिक्षा सुनावली आहे. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये मुंबई पोलिसांच्या पूर्व प्रादेशिक विभागाने उल्लेखनीय कामगिरी केली. Mumbai Police Latest News

खुनाचा प्रयत्न आणि आर्म्स ॲक्ट प्रकरण (देवनार)

परिमंडळ 6 अंतर्गत येणाऱ्या देवनार पोलीस ठाण्यात कलम 307 (खुनाचा प्रयत्न), 34, 120 (ब) भादंविसह हत्यार कायद्यानुसार (कलम 4, 25, 27) गुन्हा दाखल होता.

या गुन्ह्याची सुनावणी 19वे सत्र न्यायालय, मुंबई येथे झाली. न्यायालयाने अटक आरोपी नामे आकाश विद्याधर डावरे आणि विकास फुलचंद जैस्वाल यांच्याविरोधात सबळ पुरावे ग्राह्य धरले. दोघांना 08 वर्षे सश्रम कारावास आणि 35 हजार द्रव्यदंड. द्रव्यदंड न भरल्यास 1 वर्षाचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल.

या गुन्ह्यात आरोपींना शिक्षा मिळवून देण्यासाठी अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश यादव, तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुपे, पोलीस निरीक्षक हरिभाउ बानकर, तसेच कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुनिल सूर्यवंशी व अन्य कर्मचाऱ्यांनी (महिला पोलीस शिपाई. कदम, पोलीस शिपाई ईश्वरकर, महिला पोलीस शिपाई लोढे) महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली

बलात्कार आणि पोक्सो ॲक्ट प्रकरण (चेंबूर)

चेंबूर पोलीस ठाणे हद्दीत कलम 363, 376, 376 (2) (एन), 506भादवि सह पोक्सो ॲक्टच्या (कलम 4, 8,12) कलमांनुसार दाखल असलेल्या गुन्ह्यातही न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली.

या गुन्ह्यात आरोपी नामे शुभम अशोक तायडे (वय 22 वर्षे) याच्याविरोधात सबळ पुरावा सिद्ध झाला.

शिक्षा: शुभम तायडे याला 10 वर्षे सक्त मजुरी आणि दहा हजार रू. द्रव्यदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास आणखी 03 महिने सक्त मजुरी भोगावी लागेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0