Mumbai Police Latest News : व्यावसायिकाने केले गंभीर आरोप,व्यावसायिक संजय पुनामिया यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला
ठाणे :- राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे Sanjay Pande यांच्यावर ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संजय पांडे यांच्यासह 6 जणांविरोधात मुंबईतील व्यावसायिक संजय पुनामिया यांनी तक्रार दाखल केलीय. सोमवारी हा गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती समोर आलीय. जबरदस्ती आणि बेकायदेशीर कृत्य केल्या प्रकरणी पुनामिया यांनी तक्रार दिली होती.
मे 2021 ते 30 जून 2024 या कालावाधीत आरोपींनी त्रास दिला. संजय पुनामिया यांनी तक्रारीत संजय पांडे, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सरदार पाटील, पोलीस निरीक्षक मनोहर पाटील, श्यामसुंदर अग्रवाल, शुभम अग्रवाल, शरद अग्रवाल यांची नावे घेतली आहेत. एका गुन्ह्याचा बेकायदेशीर तपास केला आणि तक्रारादारासह इतरांना खोट्या केस दाखल करण्याच्या धमक्या दिल्याचं पुनामिया यांनी तक्रारीत म्हटलं आहे.पैसे उकळले आणि विशेष सरकारी वकील म्हणून खोटे दस्तवेज तयार करून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
166 (अ) आणि 170 (शासकीय कर्मचाऱ्यांची गैरवर्तणूक आणि खोटे रूप धारण), 120 बी (फौजदारी कट), 193 (खोट्या पुराव्यांची निर्मिती), 195, 199, 203, 205, आणि 209,352 आणि 355 384 आणि 389 465, 466, आणि 471 आदी कलमांचा समावेश आहे. ही तक्रार ठाणे नगर पोलिस ठाण्यात सोमवार, 26 ऑगस्ट 2024 रोजी ई-मेलद्वारे पुनामिया यांनी दाखल केली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली.
संजय पांडे यांनी काही दिवसात पूर्वीच घोषित केले होते की आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असून ते मुंबईच्या वर्सोवा विधानसभा क्षेत्रातून विधानसभेच्या निवडणुकी करीत उभे राहणार असल्याची घोषणा केली होती. तसेच ते स्वतःचे राजकीय पक्षही काढणार असल्याची चर्चा यापूर्वीच झाली होती. संजय पांडे यांच्यावर यापूर्वीही सीबीआयने सप्टेंबर 2022 मध्ये कथित फोन टॅपिंग प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. अटकेनंतर संजय पांडे खूप चर्चेत आला. यासोबतच सीबीआयने संजय पांडे यांच्या आयएसईसी सर्व्हिसेस कंपनीवरही गुन्हा दाखल केला होता.या कंपनीचे 2 लेखापरीक्षित स्टॉक ब्रोकर्सचे ऑडिट करण्यात आले. ऑडिटमध्ये अनेक अनियमितता आढळल्याचा आरोप सीबीआयने केला होता, परंतु पुरेशा पुराव्याअभावी सीबीआय क्लोजर रिपोर्ट दाखल करू शकली नाही. संजय पांडे हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. आयआयटी कानपूरमध्ये त्यांनी शिक्षण घेतले
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…