मुंबई

Mumbai News : दींडोशीत मागच्या दाराने बारमध्ये प्रवेश

महाराष्ट्र मिरर जितिन शेट्टी : मुंबईतील मालाड दींडोशी येथे लेडीज बार बंद असल्याचे भासवून मागच्या दाराने प्रवेश देत असल्याचा धक्कादायक प्रकार काका बारमध्ये सुरु असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी कुणी विचारणा केली तर आम्ही पोलिस आणि एक्साइजला होते देतो. त्यामुळे आमचे कुणीच काहीही करु शकत नाही असे बारचालक जगन अण्णा सांगतो. मात्र बेशिस्तपणाची संपूर्ण मर्यादा काका लेडीज बारमध्ये ओलांडली जात असल्याचे दिसते या बारविरोधात परिमंडळ १२ च्या पोलिस उपायुक्त स्मिता पाटील यांनी कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.दींडोशीमध्ये अनेक प्रकारची बेकायदेशीर कामे सुरु आहेत.

राज्य सरकारने ऑर्केस्ट्रा बारसाठी नियम आणि कायदे केले असले तरीही हे सर्व नियम आणि कायदे कागदावरच असून वास्तवाशी त्याचा काहीही संबंध नसल्याचे काका लेडीज बारमध्ये दिसून येते. बारच्या नावाखाली तिथे मुली अश्लीलता दाखवितात. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नुकतीच नवी मुंबईत कारवाई केली त्याचा धडा घेउन पोलिसांनी आतातरी ॲक्शन मोडवर येणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया सर्व स्तरातून उमटत आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

6 hours ago