क्राईम न्यूज

Mumbai News : 10 व्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू!

Mumbai Accident News : सुरक्षा उपायांचा अभाव ठरला जीवघेणा; विकासकावर गुन्हा दाखल

मुंबई | मालाड पश्चिम येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील इमारतीच्या 10 व्या मजल्यावरून खाली पडून एका तरुण स्थापत्य अभियंत्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. सुरक्षा उपकरणांचा अभाव आणि निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा आरोप करत ओंकार संख्ये (वय 24) याच्या वडिलांनी थेट विकासक व ठेकेदाराविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विकासक व पर्यवेक्षकांविरोधात निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. Mumbai Latest Accident News

सुरक्षेचा फज्जा… मृत्यूची किंमत!

बोरिवली पश्चिमेत राहणारा ओंकार संख्ये श्री जी बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्समध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होता. मालाडच्या वालानी येथे चालू असलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाचे काम तो पाहत होता. 7 जुलै रोजी नेहमीप्रमाणे सकाळी कामावर गेलेल्या ओंकारने सायंकाळी 10 व्या मजल्यावर तपासणीसाठी चढ घेतली होती. मात्र कोणतेही सुरक्षा उपकरण न दिल्याने तपासणी करत असताना तो लोखंडी फळीवरून सहाव्या मजल्यावर कोसळला.

गंभीर अवस्थेत झेनिथ रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी डोक्याच्या मागील भागातील जबर फ्रॅक्चर आणि रक्तस्राव हे मृत्यूचे प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट केले. ओंकारचे वडील विनोद संख्ये यांनी बांधकामस्थळी कोणतीही सुरक्षा साधने नसल्याचा ठपका ठेवत विकासक निमेश देसाई, त्यांच्या भागीदार आणि साईट सुपरवायझरविरोधात मालाड पोलीस ठाण्यात Mumbai Malad Police Station तक्रार दाखल केली.

पोलिसांची कारवाई; IPC कलमांतर्गत गुन्हा दाखल

सुरुवातीला अपमृत्यू म्हणून नोंद घेतलेल्या प्रकरणात, आता भारतीय न्याय संहितेच्या कलम 106(1) आणि 290 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालाड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

vivek

Recent Posts