ठाणे

Mumbai News : ‘मिठी नदी’तून कोट्यवधींचा गाळ उपसला! – बनावट ‘MOU’ घोटाळ्यात दोन मुख्य कंत्राटदार संचालक अटकेत, मुंबई EOW ची मोठी कारवाई

Mumbai Mithi River Scam : बीएमसीचे कोट्यवधी रुपये हडपले; गाळ उपसा न करताच खोटे करार सादर केले; 16 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई :- मुंबईतील बहुचर्चित मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने Mumbai Crime Branch (EOW) आज (10 डिसेंबर) दोन महत्त्वाच्या पाहिजे आरोपींना अटक केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) कोट्यवधी रुपयांच्या निधीची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. Mumbai Latest News

गुन्ह्याची कार्यपद्धती

या घोटाळ्यातील आरोपींनी, ज्यात मनपा अधिकारी, दलाल आणि कंत्राटदार यांचा समावेश आहे, यांनी 2013 ते 2023 या लांबलेल्या कालावधीत फौजदारी कट रचून महापालिकेस खोटे व बनावट डंपिंग ग्राऊंडचे एमओयू (MOU) सादर केले. मनपा अधिकाऱ्यांनी कोणतीही सत्यता पडताळणी न करता बनावट वेब्रीज व लॉगशीट कागदपत्रांच्या आधारे कंत्राटदारांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी बिले मंजूर केली.
ताज्या तपासात असे निष्पन्न झाले आहे की, आज अटक केलेल्या आरोपींनी गाळ टाकण्याची जागा (क्षेपणभूमी) असलेल्या मालक/शेतकऱ्यांच्या नावाने खोट्या स्वाक्षऱ्या करून त्यांचे नावे बनावट एमओयू/समझोता करार तयार केले. हे करार खरे असल्याचे भासवून मनपा कार्यालयास सादर करण्यात आले आणि प्रत्यक्षात गाळ उपसा न करता कंत्राट रक्कम म्हणून कोट्यवधी रुपयांची रक्कम गैरमार्गाने प्राप्त केली.

अटक केलेले आरोपी

मे. एस.एन.बी. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीचा संचालक सुनील श्यामनारायण उपाध्याय आणि मे. एम.बी. ब्रदर्स फर्मचा भागीदार महेश मेवाराम पुरोहित यांना या गंभीर गुन्ह्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

या घोटाळ्यातील यापूर्वी अटक झालेल्या आरोपींमध्ये एजंट केतन कदम व जय जोशी आणि कंत्राटदार शेरसिंग राठोर यांचा समावेश आहे. आज अटक केलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयाने 16 डिसेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

vivek

Recent Posts