मुंबई

Mumbai News : परिमंडळ–७ मध्ये मोठा उपक्रम : तब्बल ₹८९.७९ लाखांचा मुद्देमाल मालकांच्या हाती परत!

मुंबई पोलिसांच्या नागरिकाभिमुख उपक्रमांतर्गत बृहन्मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या संकल्पनेतून परिमंडळ–७ मध्ये आज (२७ सप्टेंबर २०२५) भव्य मुद्देमाल परतावा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाचा तपशील

📍 स्थळ : जैनम हॉल, एल.बी.एस. मार्ग, भांडुप (पश्चिम)
⏰ वेळ : सायं. ६.०० वा.
👮‍♂️ प्रमुख : पोलीस उप आयुक्त राकेश ओला यांच्या हस्ते वितरण

कारवाईचा आढावा

परिमंडळातील भांडुप, घाटकोपर, पंतनगर, विक्रोळी, पार्कसाईट, कांजुरमार्ग, मुलुंड आणि नवघर या ८ पोलीस ठाण्यांनी गेल्या काही महिन्यांत—

स्नॅचिंग, जबरी चोरी

घरफोडी, मोबाईल चोरी

गहाळ मौल्यवान मालमत्ता
या प्रकरणांत सखोल तपास करून ₹८९,७९,५०८/- किमतीची सोन्याचे दागिने, वाहने, मोबाईल आदी मौल्यवान मुद्देमाल हस्तगत केला.

नागरिकांचा आनंद

आजच्या कार्यक्रमात संबंधित तक्रारदारांना त्यांचा हक्काचा मालमत्ता प्रत्यक्ष परत देण्यात आला.
मुद्देमाल थेट हातात मिळाल्याने उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त करत मुंबई पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले.

मुंबई पोलिसांचा हा लोकाभिमुख उपक्रम नागरिकांचा विश्वास दृढ करीत गुन्हेगारीवर प्रभावी आळा घालण्यास मोठे पाऊल ठरत आहे.

vivek

Recent Posts