Mumbai News : ईदपूर्वी इफ्तारीत फळे वाटताना वाद झाला, 20 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या

•ओशिवरा येथे इफ्तारीच्या वेळी फळे वाटण्यावरून झालेल्या वादातून 20 वर्षीय मोहम्मद कैफ शेख याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. आरोपी जफर फिरोज खान याला अटक करण्यात आली आहे.
मुंबई :- पश्चिम मुंबईतील ओशिवरा येथे इफ्तारीच्या वेळी फळे वाटपावरून झालेल्या वादात एका 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी पश्चिम येथे रविवारी (29 मार्च) सायंकाळी ही घटना घडली असून मोहम्मद कैफ रहीम शेख असे मृताचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,22 वर्षीय जफर फिरोज खान आणि त्याच्या साथीदारांनी मोहम्मद कैफ रहीम शेख यांच्यावर हल्ला केला.वाद सुरू असताना शेखने जफर फिरोज खान यांना थप्पड मारली होती. दोघेही लहान मुलांचे कपडे बनवण्याच्या दुकानात काम करायचे. जफर फिरोज खान नंतर आपल्या मित्रांसह परत आला आणि शेखवर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केली. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल. त्याचवेळी या घटनेनंतर मृत तरुण कैफ रहीम शेख याच्या कुटुंबीयांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याप्रकरणी पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.