क्राईम न्यूजठाणेमुंबई

Mumbai Police : मुंबई पोलिसांची ‘न्यू इयर’ भेट! 1.08 कोटींचे 523 चोरीचे मोबाईल मालकांना परत; परिमंडळ-3 ची कौतुकास्पद कामगिरी

Mumbai Police Unit 3 Latest News : आग्रीपाडा, नागपाडा आणि भायखळा पोलिसांचा डंका; 3 महिन्यांत तब्बल 879 मोबाईल फोन शोधले

मुंबई | नवीन वर्षाच्या स्वागतापूर्वी मुंबई पोलिसांनी अनेक नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू आणले आहे. बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत परिमंडळ 3 च्या पथकाने मागील दोन महिन्यांत शोधलेले 523 मोबाईल फोन आणि चोरीस गेलेले दागिने असा एकूण 1 कोटी 8 लाख रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना सन्मानाने परत केला आहे. ‘सी.ई.आय.आर’ (CEIR) पोर्टलच्या प्रभावी वापरामुळे हे यश मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. Mumbai Police Latest News

कोणत्या पोलीस ठाण्याने किती मोबाईल शोधले?

परिमंडळ 3 अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांनी तांत्रिक तपासाच्या जोरावर 523 मोबाईल हस्तगत केले आहेत. त्याचा तपशील खालीलप्रमाणे:

आग्रीपाडा पोलीस ठाणे: 121 मोबाईल

नागपाडा पोलीस ठाणे: 109 मोबाईल

भायखळा पोलीस ठाणे: 103 मोबाईल

ताडदेव पोलीस ठाणे: 75 मोबाईल

वरळी पोलीस ठाणे: 63 मोबाईल

ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाणे: 52 मोबाईल

1 कोटी 8 लाख रुपयांची मालमत्ता परत

हस्तगत करण्यात आलेल्या 523 मोबाईलची अंदाजे किंमत 1 कोटी 7 लाख 21 हजार 500 रुपये इतकी आहे. याशिवाय, चोरीच्या गुन्ह्यातील जप्त केलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि 93,650 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 1 कोटी 8 लाख 15 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना परत करण्यात आला.

तीन महिन्यांत पावणेदोन कोटींची वसुली

परिमंडळ 3 ने सातत्याने ही मोहीम राबवली आहे. यापूर्वी 16 ऑक्टोबर 2025 रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर 72 लाख रुपये किमतीचे 356 मोबाईल आणि 8 लाखांचे दागिने परत केले होते. गेल्या तीन महिन्यांचा विचार केला, तर पोलिसांनी एकूण 879 मोबाईल आणि 1 कोटी 89 लाख 13 हजार 150 रुपये किमतीची मालमत्ता मालकांना मिळवून दिली आहे.

पोलीस अधिकारी व अंमलदारांचा गौरव

अपर पोलीस आयुक्त (मध्य प्रादेशिक विभाग) आणि पोलीस उपआयुक्त (परिमंडळ 3) यांच्या उपस्थितीत हा मालमत्ता हस्तांतरण सोहळा पार पडला. यावेळी ‘सी.ई.आय.आर’ (CEIR) पोर्टलवर उत्कृष्ट काम करणाऱ्या आणि सरासरीपेक्षा जास्त मोबाईल शोधणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0