क्राईम न्यूज

Mumbai Murder News : प्रेमसंबधातून तरुणाची धारदार चाकूने हत्या; धारावीतून आरोपीला अटक

Mumbai Latest Love Murder News : बहिणीच्या प्रेमास विरोध; काम करत असलेल्या कारखान्यात जाऊन डोळ्यात मिरचीपूड टाकून हल्ला

मुंबई :- मुंबईतील धारावी परिसरात प्रेमसंबंधातून एका 23 वर्षीय तरुणाची धारदार चाकूने हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मृत तरुणाचे आरोपीच्या बहिणीशी प्रेमसंबंध होते आणि त्याला विरोध असल्याने ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हे शाखा कक्ष-5 Mumbai Crime Branch Unit 5 च्या पथकाने आरोपीला तांत्रिक माहितीच्या आधारे अटक केली आहे.

प्रेमसंबधातून वैर

धारावी पोलिसांनी Dharavi Police दिलेल्या माहितीनुसार, अरमान शाह (23 वय) हा धारावीतील पुनावाला चाळीत राहत होता आणि एका कपड्यांच्या कारखान्यात काम करत होता. त्याचे त्याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, या प्रेमसंबंधांना मुलीच्या कुटुंबाचा तीव्र विरोध होता. मुलीचा भाऊ, आरोपी प्रीतेश मिश्रा (22 वय), याने अनेकदा अरमानला त्याच्या बहिणीशी असलेले संबंध तोडण्यास सांगितले होते, तरीही अरमान तिच्या बहिणीला भेटत होता. Mumbai Police Latest News

कारखान्यात जाऊन हल्ला

आरोपी प्रीतेश मिश्रा हा बुधवारी रात्री अरमान काम करत असलेल्या कारखान्यात गेला. बोलायचे आहे, असे सांगून त्याने अरमानला बाहेर बोलावून घेतले. बाहेर येताच प्रीतेशने अरमानच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली आणि खिशातून चाकू काढून त्याच्यावर जीवेघेणे वार केले. गंभीर जखमी अवस्थेत अरमानला त्याच्या सहकाऱ्यांनी तत्काळ शीव रुग्णालयात हलवले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. Mumbai Latest Murder News

या घटनेनंतर धारावी पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला. गुन्हे शाखा कक्ष-5 Mumbai Crime Branch Unit 5 च्या पथकाने या हत्येचा समांतर तपास सुरू केला. आरोपी प्रितेश मोबाईल वापरत नव्हता, तरीही पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे त्याला गुरुवारी पहाटे धारावीच्या राजीव नगर परिसरातून अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

vivek

Recent Posts