Mumbai Andheri Police Arrested Murder : मरोळ पाईपलाईनजवळ आढळला मृतदेह; तांत्रिक तपासाच्या जोरावर हत्येचे गुपित उघड, आरोपींनी रेल्वेने पळ काढला होता
मुंबई :- अंधेरी परिसरात झालेल्या खुनाच्या एका गंभीर गुन्ह्यातील दोन आरोपींना मुंबई पोलिसांनी Mumbai Police अवघ्या 24 तासांच्या आत उत्तर प्रदेशमधून अटक केली आहे. मरोळ येथे एका तरुणाचा मृतदेह आढळल्यानंतर अंधेरी पोलिसांनी 10 पथके तयार करून तातडीने तपास सुरू केला आणि अवघ्या 08 तासांत खुनाच्या या गुन्ह्याचा छडा लावला. Mumbai Latest Crime News
दिनांक 26/11 रोजी मरोळ सहार पाईपलाईनजवळील मोकळ्या प्लॉटवर एक अनोळखी इसम जखमी अवस्थेत असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. अंधेरी पोलीस घटनास्थळी पोहोचले असता, त्या तरुणाच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. पोलिसांनी त्याला तात्काळ कूपर रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यास दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली असता, मयत तरुणाचे नाव मोहित जगतराम सोनी (वय 28, मूळ रा. उत्तर प्रदेश) असल्याचे निष्पन्न झाले.
रेल्वेने पळून जाण्याचा प्रयत्न
खुनाचा गंभीर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी अंधेरी आणि परिमंडळ 10 अंतर्गत विविध पोलीस ठाण्यांमधील अधिकारी व अंमलदार यांची 10 पथके तयार करण्यात आली. या पथकांनी घटनास्थळ परिसरातील बातमीदार आणि तांत्रिक बाबींच्या मदतीने तपास सुरू केला.अल्प वेळेत तपासामध्ये पोलिसांना दोन आरोपींची नावे निश्चित झाली.
आरोपींनी मोहित सोनी यांची दिनांक 25/11 रोजी हत्या करून ते ट्रेनने उत्तर प्रदेश येथे पळून जात असल्याची माहिती तांत्रिक तपासातून प्राप्त झाली. या माहितीवरून एक पथक तात्काळ उत्तर प्रदेशात रवाना करण्यात आले. या पथकाने आरोपी गहीत गंगाराम पाल (वय 24) आणि मनोज कुमार विश्वनाथ सोनी (वय 25) यांना उत्तर प्रदेशमधून ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती आणि पोलीस उप आयुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंधेरी पोलिसांनी खुनासारखा गंभीर गुन्हा अवघ्या 08 तासांत उघडकीस आणून आपली कार्यतत्परता सिद्ध केली आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…