क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Mumbai Murder News : मुंबईत ‘दागिने चोरी’च्या संशयातून घरकाम करणाऱ्या तरुणीची आत्महत्या

Mumbai Latest Suicide News : ॲन्टॉप हिल येथील घटना; दार्जिलिंगमधील 27 वर्षीय तरुणीवर 10 लाखांचे दागिने चोरल्याचा होता आळ

मुंबई :- मुंबईतील ॲन्टॉप हिल परिसरात एका 27 वर्षीय घरकाम करणाऱ्या तरुणीने गळफास घेऊन Mumbai Suicide News आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आत्महत्येमागे घरमालकाचे दागिने गायब झाल्याने तिच्यावर घेण्यात आलेला संशय हे कारण असू शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. Mumbai Latest Crime News

मूळची दार्जिलिंग येथील रहिवासी असलेली ही तरुणी ॲन्टॉप हिल येथील एका आलिशान इमारतीत वास्तव्यास असलेल्या वृद्धाच्या घरात गेल्या दोन वर्षांपासून गृहसेविका म्हणून काम करत होती. मंगळवारी सकाळी 8 च्या सुमारास घराच्या गॅलरीत तिचा मृतदेह आढळला. तिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी ॲन्टॉप हिल पोलिसांनी Mumbai Antop Hill Police अपमृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. तिच्या आत्महत्ये मागचे नेमके गूढ अद्याप स्पष्ट झालेले नसून याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.

या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकलेले नाही, मात्र, काही दिवसांपूर्वी घरमालकाचे सुमारे 10 लाखांचे दागिने गायब झाले होते. हे दागिने चोरल्याचा संशय या तरुणीवर घेण्यात आला होता. पोलिसांनी सांगितले की, जरी चोरीचा संशय तिच्यावर घेण्यात आला असला तरी, घरमालकाने या चोरीबाबत कुठेही तक्रार दाखल केली नव्हती. केवळ आपल्यावर चोरीचा संशय घेतल्यामुळे आलेल्या नैराश्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी प्राथमिक शक्यता वर्तविण्यात येत आहे. ॲन्टॉप हिल पोलीस या प्रकरणातील सर्व शक्यता तपासत असून, आत्महत्येमागील नेमके गूढ उकलण्याचा प्रयत्न करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0