Mumbai Police Solved Murder Mystery: ट्रॉम्बे पोलिसांनी पाच संशयित आरोपींना अटक, कौटुंबिक वादातून हत्या झाल्याची शक्यता
मुंबई :- ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या Trombay Police Station हद्दीत 23 ऑगस्टच्या दरम्यान अर्धवट कुजलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह गोणीमध्ये भरून ठेवल्याचे पोलिसांना माहिती मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली.महिलेच्या मृतदेहाची ओळख पटविणे पोलिसांसमोर एक आव्हानात्मक होते. पोलीस उप आयुक्त परिमंडळ 6 यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या नेतृत्वात 10 पथके तयार करून केवळ 24 तासात मृत महिलेची ओळख पटविण्यास पोलिसांना यश आले आहे. लवकरच पोलीस संशयित आरोपींकडून या गुन्ह्याचे रहस्य उलगडणार आहे. कौटुंबिक वादातून हत्या झाल्याचा पोलिसांनी संशय वर्तविला आहे. Mumbai Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या हद्दीत 23 ऑगस्ट सकाळच्या दरम्यान एका गोणीमध्ये अनोळखी महिलेचे मृतदेह अर्धवट कुजलेल्या स्थितीत पोलिसांना आढळले. पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलम 103 (1),238 भारतीय न्याय संहिता खुनाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने पोलीस उप आयुक्त परिमंडळ 6 मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली 10 पथके तयार करून मृतदेहाची ओळख पटविण्यास पोलिसांना यश आले.पोलिसांनी केवळ 24 तासात पाच संशयित आरोपींना अटक केली असून कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांकडून शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी मयताच्या पती, दीर, नंदोई, नंदोइची आई व बहिण यांना संशयित आरोपी म्हणून अटक केली असून गुन्हा कौटुंबिक वादातून झाल्याचे दिसून येत आहे.ट्रॉम्बे पोलिसांकडून पाचही आरोपींची चौकशी चालू आहे. Mumbai Latest Crime News
पोलीस पथक
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई विवेक फणसाळकर, Mumbai CP Vivek Phansalkar विशेष पोलीस आयुक्त,देवेन भारती, सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, मुंबई, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 6 मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त, ट्रॉम्बे विभाग, राजेश बाबशेट्टी, सहायक पोलीस आयुक्त, नेहरूनगर विभाग, शशिकांत भंडारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ट्रॉम्बे पोलीस ठाणे, मुंबई राजेश शिंदे, पोलीस निरीक्षक गुन्हे, फरीद खान, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काटकर, केदार वायचळ, सुशील लोंढे, नवनाथ काळे दिपक दळवी, प्रशांत मोरकाने, भोसले व पोलीस उपनिरीक्षक शरद नाणेकर, भाउसाहेब माळवदकर, विजयसिंह देशमुख, ऋषिकेश बाबर, अजय गोल्हार, अभय काकड, अनिल बांगर, अमोल चाटे, अनिल महारनुर, गणेश कर्चे, राजू साळुंखे व पथक यांनी केली.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…