मुंबई

मुंबई महानगरपालिका निवडणूक: भाजपला ‘मोठा धक्का’; प्रचार गीतावर निवडणूक आयोगाची बंदी!

Mumbai EC On BJP : ‘भगवा’ शब्दावर आयोगाचा तीव्र आक्षेप; आचारसंहितेचा भंग झाल्याचा ठपका ठेवत परवानगी नाकारली

मुंबई | महानगरपालिका निवडणुकीच्या Mumbai BMC मतदानाला अवघे सात दिवस शिल्लक असतानाच, भारतीय जनता पक्षाला मोठा राजकीय झटका बसला आहे. मुंबई महापालिकेसाठी भाजपने मोठ्या थाटामाटात तयार केलेल्या अधिकृत प्रचार गीताला राज्य निवडणूक आयोगाने परवानगी नाकारली आहे. गीतातील शब्दांवरून आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे कारण देत आयोगाने हे पाऊल उचलले आहे.

‘भगवा’ शब्दाने अडकला पेच

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने तयार केलेल्या या विशेष प्रचार गीतामध्ये ‘भगवा’ या शब्दाचा वापर करण्यात आला होता. निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार, प्रचारात धार्मिक भावना दुखावणारे शब्द किंवा विशिष्ट रंगांचा राजकीय वापर करण्यावर कडक निर्बंध आहेत. ‘भगवा’ हा शब्दप्रयोग आचारसंहितेच्या निकषांत बसत नसल्याचे स्पष्ट करत आयोगाने या गीताच्या प्रसारणाला मज्जाव केला आहे.

दिग्गज गायकांचा आवाज, पण रणनीती फसली

हे प्रचार गीत अत्यंत भव्य स्वरूपात तयार करण्यात आले होते. लोकप्रिय गायक अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्या आवाजात हे गीत रेकॉर्ड करण्यात आले होते. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात या गीताच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याची भाजपची मोठी रणनीती होती. मात्र, ऐनवेळी आयोगाने लाल कंदील दाखवल्याने भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

निवडणूक आयोगाचा ‘बडगा’

निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत आपला कडक पवित्रा पुन्हा एकदा स्पष्ट केला आहे. मुंबईसह राज्यातील इतर महापालिकांसाठी आता अवघा आठवडा उरला असून सर्वच पक्षांनी आपली पूर्ण ताकद झोकून दिली आहे. सोशल मीडिया आणि डिजिटल जाहिरातींवर भर दिला जात असतानाच, मुख्य प्रचार गीतावर बंदी आल्याने भाजप आता या गीतातील शब्द बदलून पुन्हा परवानगी घेणार की नवा पर्याय निवडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

19 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago