Mumbai Mhada Breaking News : म्हाडाची मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, संभाजी नगर येथील 5 हजार घरांची बंपर लॉटरीही निघणार आहे.

Mumbai Mhada Breaking News : म्हाडा मुंबईत पुढील एका वर्षात 5,199 घरे बांधणार आहे. तर कोकण मंडळ 2025-26 मध्ये 9,902 घरे बांधणार आहे.
मुंबई :- सर्वसामान्यांचे घर असण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) येत्या एका वर्षात मुंबईत 5,199 घरे बांधणार आहे. नागरिकांना परवडणारी घरे देण्यासाठी म्हाडाचे मुंबई मंडळ 5,749.49 कोटी रुपये खर्च करणार आहे.
मुंबईसोबतच ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा रोड, विरार या ठिकाणी स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी 2025-26 मध्ये 9,902 घरे तयार करण्याचे नियोजन कोकण मंडळाने केले आहे. हे घर तयार करण्यासाठी कोकण मंडळाकडून 140.85 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
गगनाला भिडलेल्या मालमत्तेच्या किमतींमध्ये नागरिकांना परवडणारी घरे देण्यासाठी म्हाडाने 2024-25 आणि 2025-26 चा सुधारित अर्थसंकल्प सादर केला.2025-26 साठी 15951.23 कोटी रुपये आणि 2024-25 साठी 10901.07 कोटी रुपयांच्या बजेटला प्राधिकरणाने मंजुरी दिली.
मुंबईतील घरांची मागणी लक्षात घेऊन म्हाडाने मुंबई मंडळाची विशेष काळजी घेतली आहे. घरबांधणीसाठी वाटप करण्यात आलेल्या एकूण रकमेपैकी सुमारे 36 टक्के रक्कम मुंबईतील घरे तयार करण्यासाठी वापरली गेली आहे.म्हाडाने अर्थसंकल्पातून राज्यभरात 19,497 घरे बांधण्याचे नियोजन केले आहे. मुंबई आणि कोकण मंडळासोबतच म्हाडाने नाशिक, पुणे, छत्रपती संभाजी नगर आणि नागपूर येथे घरे बांधण्याचे नियोजन केले आहे.
मुंबई मंडळाला मिळालेल्या एकूण रकमेपैकी सर्वाधिक रक्कम मुंबईतील 100 वर्षे जुन्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासासाठी देण्यात आली आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात 2,800 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.