Mumbai Local Mega Block Update: दुरुस्ती, देखभाल आणि अभियांत्रिक कामामुळे रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे
मुंबई :- रविवारी (6 ऑक्टोबर ) रेल्वेचा मेगा ब्लॉक Mumbai Local Mega Block Update घेण्यात येणार आहे. मध्य आणि हार्बर या मार्गांवर दिवसा मेगाब्लॉक आहे.मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत माटुंगा आणि मुलुंडदरम्यान अप आणि डाउन धिम्यामार्गावर, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चुनाभट्टी, वांद्रे स्थानकांदरम्यान सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत अप हार्बर मार्गावर आणि सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत डाउन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनो घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक बघूनच बाहेर पडा. कारण मध्य रेल्वेच्या लोकल सेवा मेगा ब्लॉकमुळे 15 ते 20 मिनिटांनी उशिराने असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. Mumbai Local Mega Block Update
हार्बर रेल्वे
ब्लॉकपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी 10.17 वाजता सुटेल आणि सकाळी 11.36 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल आणि ब्लॉकनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी पहिली लोकल पनवेल येथून सायंकाळी 04.10 वाजता सुटेल आणि सायंकाळी 05.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. Mumbai Local Mega Block Update
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…