Mumbai MegaBlock Update : मुंबईकरांनो सावधान! 6 जुलैला मेगा ब्लॉक; लोकलसेवा होणार विस्कळीत
Mumbai Local Latest News : मध्य, हार्बर व ट्रान्स-हार्बर मार्गांवर रविवारी दिवसभर मर्यादित सेवा,पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री ‘जम्बो ब्लॉक
मुंबई | मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा कणा असलेल्या लोकल सेवा येत्या रविवार, 6 जुलै 2025 रोजी ‘मेगा ब्लॉक’मुळे मोठ्या प्रमाणावर प्रभावित होणार आहेत. रेल्वेच्या नियोजित देखभाल, ट्रॅक तपासणी आणि सिग्नलिंगच्या कामांमुळे मध्य, हार्बर, ट्रान्स-हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर सेवा वेळेवर राहणार नाही. त्यामुळे प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. Mumbai Local Latest News
मध्य रेल्वेवर सकाळी 10.36 ते दुपारी 3.10 दरम्यान फास्ट लोकल थांबणार
मध्य रेल्वेवरील सीएसएमटी–कर्जत/कल्याण मार्गावर फास्ट लोकल सेवा थांबवण्यात येणार आहे.
सदर ब्लॉक दरम्यान फास्ट लोकल बंद राहतील आणि काही गाड्या स्लो मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
ठाणे, कुर्ला, दादर, माटुंगा, भायखळा या महत्त्वाच्या स्थानकांवर गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अपील केलं आहे की, अत्यावश्यक असेल त्याच प्रवासाची योजना करा.
हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरही लोकलसेवा प्रभावित
हार्बर मार्गावर सीएसएमटी–वाशी आणि पनवेल–थाणे मार्गावर सकाळी 9.45 ते दुपारी 3.53 पर्यंत सेवा बंद राहणार आहे.ट्रान्स-हार्बर मार्गावर देखील काही लोकल रद्द केल्या जाणार आहेत.
ब्लॉक दरम्यान वाशी, नेरुळ, सानपाडा, चेंबूर या स्थानकांवर पर्यायी बस किंवा रिक्षा वाहतूक वाढण्याची शक्यता आहे.
पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री ‘जम्बो ब्लॉक’
मुंबई सेंट्रल ते माहिम मार्ग प्रभावित
रात्री 12.15 ते सकाळी 4.15 या वेळेत पश्चिम रेल्वेवर ‘जम्बो ब्लॉक’ ठेवण्यात आला आहे.मुंबई सेंट्रल ते माहिम दरम्यान फास्ट मार्गावरील गाड्या स्लो मार्गावर वळवण्यात येतील.यामुळे या काळात प्रवास करणाऱ्यांनी वेळेआधी स्टेशनवर पोहोचण्याची खबरदारी घ्यावी.
सिग्नलिंग व ट्रॅक दुरुस्तीसाठी हा ब्लॉक अत्यावश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



