Mumbai Local Train Update : मुंबईकरांनो उपनगरीय रेल्वेने प्रवास करणार असाल तर रेल्वेचे टाईम टेबल बघूनच घराबाहेर पडा, मुंबईत मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
मुंबई :- मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील रेल्वे रूळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. Mumbai Local Train Update हार्बर आणि मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. Mumbai Mega Block Update पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते चर्चगेट अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असून, ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील, असे रेल्वेकडून सांगण्यात आलेय.
मध्य रेल्वे कशाप्रकारे असणार मेगा ब्लॉक
स्थानक- माटुंगा ते मुलुंड मार्ग अप आणि डाउन जलद वेळ – सकाळी 11.5 ते दुपारी 3.55 परिणाम ब्लॉकमुळे जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यांमुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या 20 मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
हार्बर रेल्वे मार्गावरील कशाप्रकारे असणार मेगा ब्लॉक
स्थानक- पनवेल ते वाशी अप आणि डाउन वेळ – सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 परिणाम – ब्लॉक कालावधीत पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल ते ठाणे ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरूळ आणि उरण स्थानकांदरम्यान सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी यादरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
स्थानक – सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत ब्लॉक कालावधीत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सर्व सेवा जलद मार्गावर चालवल्या जातील. याशिवाय ब्लॉकदरम्यान काही उपनगरी गाड्या रद्द राहणार आहेत. चर्चगेटहून काही गाड्या वांद्रे/दादर स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरिजनेट केल्या जातील.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…