Mumbai Mega Block : रविवारी (11 ऑगस्ट) मुंबईकरांनो घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा
•मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर रेल्वेचा “मेगाब्लॉक”, 15 ते 20 मिनिट मध्य रेल्वेच्या लोकल उशिराने
मुंबई :- रविवारी (11 ऑगस्ट 2024) रेल्वेचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य आणि हार्बर या मार्गांवर दिवस मेगा ब्लॉक आहे.मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत माटुंगा आणि मुलुंडदरम्यान अप आणि डाउन धिम्यामार्गावर, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चुनाभट्टी, वांद्रे स्थानकांदरम्यान सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत अप हार्बर मार्गावर आणि सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत डाउन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनो घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक बघूनच बाहेर पडा. कारण मध्य रेल्वेच्या लोकल सेवा मेगा ब्लॉकमुळे 15 ते 20 मिनिटांनी उशिराने असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
मध्य रेल्वे
माटुंगा ते मुलुंड या मार्ग अप आणि डाउन धीमा सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 असणार आहे.ब्लॉक वेळेत धीम्या मार्गावरील अप आणि डाउन मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.
हार्बर रेल्वे
सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान अप आणि डाउन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 मेगा ब्लॉक असणार आहे.सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर/वाशी आणि सीएसएमटी ते वांद्रे/गोरेगाव या मार्गावरील अप आणि डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. कुर्ला ते पनवेलदरम्यान 20 मिनिटांच्या फरकाने विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहे.