Mumbai Mega Block News : 1 सप्टेंबर रोजी घेणार रेल्वेचा मेगाब्लॉक; माटुंगा ते मुलुंड दरम्यानच्या रेल्वे सेवावर परिणाम,पश्चिम रेल्वेवर दहा तासांचा ब्लॉक
Mumbai Railway Mega Block Update सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत माटुंगा ते मुलुंड दरम्यानच्या अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर परिणाम
मुंबई :- दुरुस्ती आणि देखभाल कामानिमित्त मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवारी (1 सप्टेंबर 2024) रोजी रेल्वे कडून मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर दहा तास रेल्वेचा मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा, माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. त्यानंतर त्या मुलुंड स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
पश्चिम रेल्वे मार्गावरील गोरेगाव –कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गाचे काम करण्यासाठी शनिवारी रात्री 10 ते रविवारी सकाळी 8 दरम्यान गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर 10 तासांचा मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सर्व अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल बोरिवली आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत.
चर्चगेट – बोरिवली धीम्या लोकल गोरेगाव स्थानकांवरून अंशतः करून पूर्ववत करण्यात येणार आहेत. तसेच ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन मेल/एक्स्प्रेस रेल्वेगाड्या अंदाजे 10 ते 20 मिनिटे विलंबाने धावणार आहेत. तर ब्लॉकदरम्यान काही लोकल रद्द आणि काहीे अंशतः रद्द करण्यात येणार आहेत.