क्राईम न्यूज

Mumbai Malwani Police : सायबर ठगांना मालवणी पोलिसांची झटका-कारवाई!

Mumbai Malwani Police Latest News : तक्रारदाराची 99,995 रुपयांची लुटलेली रक्कम परत – सायबर गुन्हेगारांना मुंबई पोलिसांचा जबर झटका!

मुंबई : आजच्या डिजिटल युगात बँक खात्यांवर डल्ला मारणाऱ्या सायबर ठगांना अखेर मालवणी पोलिसांनी Mumbai Malwani Police चपराक दिली आहे.
सायबर गुन्ह्यात अडकवून नागरिकांचे पैसे हडप करणाऱ्यांना पोलिसांनी दाखवून दिलंय की — मुंबई पोलिसांच्या नजरेतून कुणीही सुटू शकत नाही! Mumbai Latest Cyber Crime News

मालवणी परिसरातील चंपालाल वालाराम परमार या व्यावसायिकाचा बँक खाते क्रमांकातून तब्बल ₹99,995 रक्कम गायब झाली होती.
सर्वसामान्य माणसासाठी ही रक्कम म्हणजे थेट महिन्यांचा घामगाळ पैसा.
पण मालवणी पोलीस आणि सायबर पथकाने ही बाब ‘फक्त तक्रार’ म्हणून न घेता तात्काळ कारवाई करत त्या ठगांचा मार्गच बंद केला!

कारवाईचा वेग – ठगांच्या खात्याला फ्रीझ!

तक्रार मिळताच पोलिसांनी विजेच्या वेगाने तपास सुरू केला.
फसवणुकीच्या रकमेचा मागोवा घेत — ज्या बँक खात्यावर पैसे वळवले गेले होते ते खाते तात्काळ गोठवण्यात आले!
यानंतर न्यायालयीन परवानगी घेत, संपूर्ण रक्कम तक्रारदाराच्या खात्यात परत जमा करण्यात आली.
होय — 99,995 रुपये एकाही पैशाचा तोटा न होता परत मिळाले, ही पोलिसांची मोठी कामगिरीच!

सायबर गुन्हेगारांनो सावधान!

मालवणी पोलिसांनी दाखवून दिलंय की सायबर गुन्हेगारीच्या दुनियेत कोणतंही ‘सेफ झोन’ उरलेलं नाही.
तंत्रज्ञान वापरून लोकांची लूट करणारे गुन्हेगार आता स्वतः पोलिसांच्या तंत्रजाळात अडकत आहेत.
ही कारवाई केवळ एका फिर्यादीचा विजय नाही — तर सायबर गुन्हेगारांना दिलेला मुंबई पोलिसांचा इशारा!

ही यशस्वी कामगिरी शक्य झाली…

संदीप जाधव (उप आयुक्त, परिमंडळ-११),
श्रीमती नीता पाडवी (सहाय्यक पोलीस आयुक्त, मालवणी विभाग)
यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर, पो.नि. जीवन भातकुळे,
आणि तपास पथकातील –
पो.उ.नि. दिगंबर कुरकुटे, पो.उ.नि. अमर शिंदे, पो.ह. राबड, पो.शि. पोतेकर
या सर्वांनी ही कारवाई अचूक नियोजनातून पार पाडली.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago