Megablock on all three Mumbai local routes : रविवारी मुंबईतील तिन्ही लोकल मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. या मेगाब्लॉकमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मात्र, पश्चिम रेल्वेवर दिवसभरात मेगाब्लॉक नाही.
मुंबई :- मुंबईतील लोकल रेल्वे Mumbai Local Train वाशांना रविवारी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वीकेंडला लोकल रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेतल्याची माहिती देण्यात येत आहे. उपनगरातील रेल्वे मार्गांच्या देखभालीसाठी 1 डिसेंबरला हा मेगाब्लॉक घेण्यात येत असल्याचे रेल्वे विभागाकडून सांगण्यात येत आहे. Megablock on all three Mumbai local दरम्यान, पश्चिम रेल्वेवर कोणताही मेगाब्लॉक नसल्यामुळे हा मार्ग दिवसभराच्या प्रवासासाठी खुला राहणार आहे. रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेशी संबंधित तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी हा मेगाब्लॉक घेण्यात येत असल्याची माहिती मुंबई लोकल रेल्वे विभागाकडून प्राप्त झाली आहे.मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते विद्याविहार अप-डाऊन धीम्या मार्गावर आणि हार्बर मार्गाच्या पनवेल ते वाशी अप-डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. या वेळी या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना रविवारी त्रास होणार आहे.
सीएसएमटी ते विद्याविहार अप-डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.25 पर्यंत ब्लॉक असेल. या कालावधीत सीएसएमटीहून सुटणाऱ्या धीम्या गाड्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन एक्सप्रेस मार्गावरून वळवण्यात येतील.या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शिव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकातून अप मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपरहून सुटणाऱ्या यूपी स्लो गाड्या विद्याविहार ते सीएसएमटी दरम्यान फास्ट मार्गावर वळवण्यात येतील.तर, कुर्ला, शिव, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात ते थांबवण्यात येणार आहे.
हार्बर लाईन पनवेल-वाशी अप-डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक दरम्यान, अप हार्बर मार्गावरील पनवेल किंवा बेलापूर ते सीएसएमटी आणि डाउन हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर या मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.पनवेलहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्ग आणि डाऊन मार्गावरील सेवाही रद्द करण्यात आल्या आहेत. या काळात सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान ठाणे-वाशी किंवा नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.
पश्चिम रेल्वे मार्ग मरीन लाईन्स ते माहीम डाऊन धीम्या मार्गावर उद्या सकाळी 12.15 ते पहाटे 4.15 पर्यंत ब्लॉक असेल. या कालावधीत चर्चगेट ते माहीम स्थानकांदरम्यान सर्व डाऊन स्लो मार्गावरील गाड्या डाऊन एक्स्प्रेस मार्गावर धावतील.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…