Mumbai Local Update : मुंबईकरांनो..! रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा, कारण रेल्वेचा मेगा ब्लॉक
Mumbai Local Update : रविवारी 21 जुलै 2024, रेल्वेचा मध्य,हार्बर मेगा ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन मेगाब्लॉक
मुंबई :- मुंबईकरांनो रविवारी रेल्वेने Mumbai Train Sunday Megablock प्रवास करणार असेल तर जाणून घ्या कसा असणार आहे मुंबईकरांचा प्रवास Mumbai Local Train Update मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी 21 जुलै 2024 रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा -मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी – चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन मेगाब्लॉक असणार आहे.
मध्य रेल्व
कुठे – माटुंगा- मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर
कधी- सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत
या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. या सेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशीराने पोहोचेल. Mumbai Central Local Train Update
हार्बर रेल्वे
कुठे – सीएसएमटी – चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावर
कधी – 11.10 ते 4.10 वाजेपर्यंत
ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून वांद्रे/गोरेगावसाठी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे. तर, पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीकरीता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) दरम्यान विशेष सेवा 20 मिनिटांच्या वारंवारतेने चालवल्या जातील. Mumbai Harbour Train Latest Update
पश्चिम रेल्वे
कुठे – सांताक्रूझ ते माहीम अप – डाऊन धीम्या मार्गावर
कधी – मध्यरात्री 1 ते पहाटे 4.30 वाजेपर्यत
या ब्लॉकदरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा मुंबई सेंट्रल ते सांताक्रूझ रेल्वे स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. यामुळे लोअर परळ, माहीम आणि खार रोड स्थानकांवर लोकल गाड्यांना दुहेरी थांबा देण्यात येणार आहे. प्लॅटफॉर्मच्या अपुऱ्या लांबीमुळे आणि प्लॅटफॉर्मच्या अभावी महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकावरही थांबणार नाही. Western Train Local Update