मुंबई

Mumbai Local Update : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशीही रेल्वेचा मेगाब्लॉक

Mumbai Local News Megablock On 14 April In Mumbai : मुंबईकरांनो आणि आंबेडकर अनुयायी घराच्या बाहेर पडताना रेल्वेचे वेळापत्रक पाहून बाहेर पडा

मुंबई :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर Dr. Baba Saheb Ambedkar यांच्या जयंतीदिनी रविवार 14 एप्रिल रोजी रेल्वेने तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घोषित केला आहे Mega block On 14 April . विविध अभियांत्रिकी व देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.मध्य रेल्वे ठाणे ते कल्याण अप आणि धीम्या मार्गावर रविवारी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत ठाणे –कल्याणदरम्यानची अप आणि धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. या लोकल डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे या स्थानकांत थांबतील. Mumbai Local News Megablock On 14 April In Mumbai

हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर रविवारी सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – पनवेल / बेलापूर / वाशी अप आणि डाऊन लोकल सेवा बंद राहतील. यादरम्यान सीएसएमटी – कुर्ला आणि पनवेल – वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील.

रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावरी बोरिवली ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावरही सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या कालावधीत बोरिवली –गोरेगाव दरम्यान सर्व अप आणि डाऊन जलद लोकल धीम्या मार्गावर धावतील. प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. Mumbai Local News Megablock On 14 April In Mumbai

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0