Mumbai Local Update : मराठी नववर्षाच्या स्वागताकरिता रेल्वेने प्रवासी करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची मध्य, हार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक!

Mumbai Local Train Update : पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्रीनंतर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या स्थानकादरम्यान असणार मेगाब्लॉक
मुंबई :- रविवारी म्हणजेच 30 मार्च रोजी गुढीपाडवा संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. Mumbai Local Train Update मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई आणि मुंबई उपनगरात मोठ्या प्रमाणात शोभायात्रा काढल्या जातात आणि या यात्रेत मोठ्या प्रमाणे मराठी माणूस सहभागी होत असतो अशातच या यात्रेत सहभागी होण्यासाठी मुंबईकरांना रेल्वेने प्रवास करणार असाल तर मेगाब्लॉकच्या समस्यांना तोंड द्यावे लागेल. उद्या रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. Mumbai Train Update ठाणे ते कल्याण आणि कुर्ला ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे.पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ ते माहीम स्थानकादरम्यान शनिवारी मध्यरात्रीनंतर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही.
मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण या तालुका दरम्यान अप आणि डाऊन धीमा मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही 15 ते 20 मिनिटे उशिराने धावणार आहेत.
हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी/बेलापूर/पनवेलदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी मार्गावर विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. यामुळे हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या उशिराने धावणार आहेत.
शनिवारी मध्य रात्रीनंतर 12.30 ते रविवारी पहाटे 4.30 पश्चिम रेल्वे मार्गावरील सांताक्रुझ ते माहीम स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे.रात्रकालीन ब्लॉकमुळे रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. लोअर परळ, माहीम आणि खार रोड स्थानकांवर दुहेरी थांबा देण्यात येणार आहे. महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड येथे फलाट अनुपलब्धतेमुळे लोकल थांबणार नाही. ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही उशिराने धावणार आहेत.