Mumbai Local Train Update : रविवार (16 मार्च) मेगाब्लॉकच्या दरम्यान रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते.
मुंबई :- रविवारी 16 मार्च दरम्यान रेल्वेकडून मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. Mumbai Local Train Update ठाणे ते कल्याण आणि पनवेल ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने पश्चिम रेल्वेने होळीनिमित्त रविवारी दिवसा असणारे सर्व ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. Mumbai Mega Block Train Update रेल्वे कडून मेगाब्लॉकच्या वेळेत रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते.
मध्य रेल्वे कडून कल्याण ते ठाणे या स्थानकादरम्यान सकाळी 10.40 वाजल्यापासून ते दुपारी 3.40 दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावरील लोकल अप आणि डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. सीएसएमटी येथून ये-जा करणाऱ्या मेल-एक्स्प्रेसवर ही ब्लॉकचा परिणाम होणार आहे. यामुळे रविवारी (16 मार्च ) सर्व रेल्वे फेऱ्या 20 मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी सकाळी 11.05 वाजल्यापासून ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे .दरम्यान ब्लॉक वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल / बेलापूर तसेच पनवेल ते ठाणे दरम्यान अप आणि डाउन मार्गावरील लोकल वाहतूक बंद राहणार आहेत. सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल धावणार आहेत. ठाणे ते वाशी / नेरुळ आणि बेलापूर / नेरुळ ते उरणदरम्यान लोकल फेऱ्या उपलब्ध राहणार आहेत.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…