Mumbai Local Train Update : मध्य रेल्वेवर उद्या रविवार 12 जानेवारी मेगाब्लॉक!
Mumbai Local Train Update : मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई :- मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. Mumbai Local Train News मुंबईत रविवारी लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. रविवारी घराबाहेर पडताना रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा कारण मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉकची घोषणा केली आहे. मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे.
रविवारी सकाळी 8 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे.मध्य रेल्वेच्या विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान पाचवी आणि सहावी लाईनवर मेगाब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉकमुळे अप मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे दुसऱ्या मार्गांवरून वळवण्यात येणार आहे. या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे येथे अप जलद मार्गावर वळवल्या जातील.
विद्याविहार स्थानकावर सहाव्या लाईनवर वळवल्या जातील. त्यानंतर या गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिराने त्या स्थानकावर पोहोचतील. या गाड्यामध्ये पटणा -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस आणि काकीनाडा -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसचा समावेश आहे.
रविवारी सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत ट्रान्स हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक असणार आहे. अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक असले. त्यामुळे वाशी येथून सकाळी 10.25 वाजता पासून नेरुळ येथून सायंकाळी 4.09 वाजता ठाण्याच्या दिशेने सुटणाऱ्या अप ट्रान्स हार्बर लाईन सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.35 ते सायंकाळी 04.07 पर्यंत वाशी/नेरूळ/पनवेलच्या दिशेने डाउन ट्रान्स हार्बर सेवा रद्द होणार आहेत.
हा मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी घेण्यात आल्याची माहिती रेल्वेने दिली. तसेच प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल सहकार्य करावे, असेही आवाहन रेल्वे प्रशासनाने केले.
मेगाब्लॉक दरम्यान मेल गाड्या कशा प्रमाणे धावणार आहे
मेगाब्लॉकमुळे डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या देखील वळवण्यात येईल. डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या विद्याविहार स्थानकावर डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. पुढे ठाणे येथे पाचव्या मार्गावर वळवल्या जातील. त्यामुले या गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिराने स्थानकावर पोहोचतील. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपुर एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस- जयनगर पवन एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस -तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेसचा समावेश आहे.