Mumbai Train Accident : दिवा-मुंब्रा रेल्वे अपघात: प्रवाशांचा मृत्यू, चौकशी सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Mumbai Today Harbour Local MegaBlock News : कुर्ला-टिळक नगर दरम्यान नवीन मार्गिकेचे काम; वडाळा रोड ते मानखुर्ददरम्यान लोकल सेवा राहणार नाही
मुंबई :- मुंबईतील हार्बर मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. मध्य रेल्वेने आज रात्रीपासून हार्बर मार्गावर 14.30 तासांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. कुर्ला आणि टिळक नगर स्थानकांदरम्यान नवीन डायव्हर्जन मार्गिकेचे काम करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येत आहे. या ब्लॉकमुळे वडाळा रोड आणि मानखुर्ददरम्यान लोकल सेवा पूर्णपणे थांबणार आहे. Mumbai Local Train News
मेगाब्लॉकची वेळ आणि वेळापत्रक:
हा मेगाब्लॉक आज शनिवारी रात्री 11.05 वाजता सुरू होईल आणि उद्या रविवारी दुपारी 1.35 पर्यंत चालेल.
ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल
पनवेलहून सीएसएमटीसाठी शेवटची लोकल रात्री 9.52 वाजता सुटेल.
सीएसएमटीहून वाशी/बेलापूर/पनवेलसाठी शेवटची लोकल रात्री 10.14 वाजता सुटेल.
ब्लॉकनंतरची पहिली लोकल:
पनवेलहून सीएसएमटीसाठी पहिली लोकल रविवारी दुपारी 1.09 वाजता सुटेल.
सीएसएमटीहून डाऊन हार्बर मार्गावरील पहिली लोकल रविवारी दुपारी 1.30 वाजता सुटेल.
या ब्लॉकमुळे प्रवाशांना होणारी गैरसोय कमी करण्यासाठी, रेल्वे प्रशासनाने पनवेल-मानखुर्द-पनवेल दरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन या बदलानुसार करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…