मुंबई

Mumbai Local News : रविवारी 2 फेब्रुवारी रेल्वेचा मेगाब्लॉक, मध्य रेल्वेवर प्रवाशांचा होणार खोळंबा!

Mumbai Local Train News : मुंबई आणि मुंबई उपनगर मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शनिवारी आणि रविवारी मेगाब्लॉक असणार आहे.

मुंबई :- मुंबई आणि मुंबई उपनगरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. Mumbai Local News उद्या म्हणजेच रविवारी 2 फेब्रुवारी रोजी रेल्वेने प्रवास करणार असाल तर निश्चितच रेल्वेच्या वेळापत्रक पाहूनच घरा बाहेर पडा अन्यथा रेल्वेच्या मेगाब्लॉकचा सामना करावा लागेल. कारण मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे घेण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं काही लोकल रद्द करण्यात येतील तर काही लोक उशिराने धावणार आहेत. तर, शनिवारी कल्याण-वांगणी दरम्याम ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेवर माटुंगा- मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. माटुंगा – मुलुंड स्थानकांदरम्यान लोकल नियोजित थांब्यांवर थांबतील. तर, ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद लोकल मुलुंड येथे पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. सीएसएमटी – पनवेलदरम्यान हार्बर मार्गावर आणि ठाणे – पनवेलदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक नाही.

पश्चिम रेल्वेवर जोगेश्वरी – कांदिवलीदरम्यान पाचव्या मार्गिकेवर ब्लॉक असणार आहे. सकाळी 9.30 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत वांद्रे टर्मिनसवरून निघणाऱ्या सर्व मेल, एक्स्प्रेस अंधेरी – बोरिवलीदरम्यान डाऊन जलद मार्गावरून धावतील. तसेच काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.

कल्याण आणि वांगणी दरम्यान एफओबीचे मुख्य गर्डर उभारणीसाठी मध्य रेल्वे शनिवारी रात्री विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे शेवटची कर्जत लोकल 11.51 वाजता सीएसएमटीतून सुटणार आहे. कल्याण आणि वांगणी दरम्यान एफओबीचे मुख्य गर्डर उभारणीसाठी विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्यरात्री 1.30 ते 3.30 या कालावधीत दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.ब्लॉकपूर्वी कर्जत येथे जाणारी शेवटची लोकल सीएसएमटी येथून रात्री 11.51 वाजता सुटेल आणि कर्जत येथे 1.49 वाजता पोहोचेल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

vivek

Share
Published by
vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

16 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

16 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

21 hours ago