Mumbai Local Train News : माटुंगा-मुलुंड जलद मार्ग आणि सीएसएमटी-वांद्रे/चुनाभट्टी दरम्यान तांत्रिक कामांसाठी ब्लॉक; प्रवाशांना मनस्ताप होण्याची शक्यता
मुंबई l मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या, रविवारी (25 जानेवारी) विविध तांत्रिक कामांसाठी आणि रुळांच्या देखभालीसाठी रेल्वे प्रशासनाकडून ‘मेगाब्लॉक’ जाहीर करण्यात आला आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर एकाच वेळी घेण्यात येणाऱ्या या ब्लॉकमुळे रविवारी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांच्या प्रवासावर मोठा परिणाम होणार असून, अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. Mumbai Local Train News
मध्य रेल्वे: जलद मार्गावरील गाड्या ‘स्लो’ ट्रॅकवर
मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या काळात जलद मार्गावरील सर्व गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे गाड्या ठाणे आणि माटुंगा दरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. साहजिकच, यामुळे लोकल 15 ते 20 मिनिटे विलंबाने धावणार असून प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागेल.
हार्बर रेल्वे: सीएसएमटीची संपर्क तुटणार
हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. या कालावधीत सीएसएमटीहून वाशी, बेलापूर, पनवेल आणि गोरेगावला जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द राहतील. प्रवाशांच्या सुविधेसाठी पनवेल ते कुर्ला (फलाट क्रमांक 8) दरम्यान दर 20 मिनिटांनी विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत.
पश्चिम रेल्वे: अंधेरी-गोरेगाव दरम्यान कामाचा फटका
पश्चिम रेल्वेवरही प्रवाशांना ब्लॉकचा सामना करावा लागणार आहे. माहीम ते अंधेरी दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असेल, ज्यामुळे चर्चगेट ते गोरेगाव आणि सीएसएमटी ते गोरेगाव या फेऱ्या रद्द राहतील. तसेच, अंधेरी ते गोरेगाव दरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेतही तांत्रिक कामे केली जाणार आहेत.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…