Mumbai Local News :?रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक, रेल्वेप्रवाशांसाठी खास माहिती

Mumbai Local Train Update : रविवारी, 16 फेब्रुवारी रोजी मध्य आणि पश्चिम रेल्वे मेगाब्लॉक घेणार असून त्यामुळे मुंबई लोकल प्रवाशांची गैरसोय होऊ शकते.
मुंबई :- मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे या रविवारी, 16 फेब्रुवारीला मुंबईतील लोकल ट्रेन प्रवाशांना काही गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. Mumbai Local Update अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रेल्वे अधिकाऱ्यांनी हे ब्लॉक जाहीर केले आहेत.मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी-विद्याविहार, कुर्ला-वाशी आणि पनवेल-वाशी या मार्गावर मेगाब्लॉक लागू होणार आहे.
सीएसएमटी ते विद्याविहार (अप आणि डाऊन स्लो लाईन)
सकाळी 10.55 ते दुपारी 3.35 पर्यंत सीएसएमटीहून डाऊन स्लो मार्गावर जाणाऱ्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकावर थांबतील.घाटकोपरहून सुटणाऱ्या अप स्लो गाड्याही विद्याविहार येथून जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि काही प्रमुख स्थानकांवरच थांबतील.
कुर्ला-वाशी (अप आणि डाऊन हार्बर लाईन) वर ब्लॉक
सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत असेल या कालावधीत सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर/वाशीपर्यंत धावणाऱ्या लोकल गाड्या रद्द राहतील.ब्लॉक दरम्यान सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी या भागांवर विशेष उपनगरीय गाड्या चालवल्या जातील.हार्बर मार्गावरील प्रवासी ठाणे-वाशी/नेरुळ या दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत प्रवास करू शकतात.
पश्चिम रेल्वेवर जम्बो ब्लॉक
पश्चिम रेल्वेनेही बोरिवली ते गोरेगाव स्थानकांदरम्यान पाच तासांचा जम्बो ब्लॉक जाहीर केला आहे. ब्लॉक कालावधी. रविवार, 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:00 ते दुपारी 3:00 पर्यंत असेल.