Mumbai Local News Update : रेल्वेरुळांसह सिग्नल यंत्रणेची देखभाल-दुरुस्ती कामकाजामुळे रेल्वे कडून मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. मेगा ब्लॉक दरम्यान अनेक लोकल गाड्या विस्कळीत होण्याची शक्यता
मुंबई :- मुंबईकरांसाठी तसेच उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.रेल्वेने रविवारी 20 एप्रिल रोजी ब्लॉक घोषित केला आहे. Mumbai Local News छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-वाशी/नेरूळ मध्य रेल्वे पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मरीन लाईन्स ब्लॉक घेण्यात येणार आहे.रेल्वेरुळांसह सिग्नल यंत्रणेची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. त्यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या असून अनेक लोकल रेल्वे या 15 ते 20 मिनिटांनी उशिराने धावणार आहे. Mumbai Local Train News
मध्य रेल्वे
सीएसटी ते विद्याविहार अप आणि डाउन जलद दरम्यान सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.ब्लॉकवेळेत अप-डाउन जलद मार्गावरील लोकल फेऱ्या अप-डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. फलाट उपलब्ध नसल्याने करी रोड, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि मशिद स्थानकांवर लोकल उपलब्ध राहणार नाही. यामुळे लोकल फेऱ्या 15 ते 20 मिनिटे विलंबाने धावणार असून काही लोकल रद्द राहणार आहेत.
हार्बर रेल्वे
ठाणे ते वाशी नेरूळ अप आणि डाउन सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.40 मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून ब्लॉक वेळेत ठाणे ते पनवेल/वाशी/नेरुळदरम्यान धावणाऱ्या ट्रान्स-हार्बरवरील अप आणि डाउन लोकल फेऱ्या बंद राहणार आहेत. हार्बर मार्गावर कोणताही ब्लॉक असणार नाही. यामुळे वेळापत्रकाप्रमाणे हार्बरवर लोकल धावणार आहेत.
पश्चिम रेल्वे
चर्चगेट आणि मरीन लाइन्स असा अप आणि डाउन जलद शनिवारी रात्री 8.50ची बोरिवली-चर्चगेट आणि रविवारी पहाटे 4.38 ची चर्चगेट-बोरिवली लोकल रद्द राहणार आहेत. काही लोकल फेऱ्या अंशत: रद्द राहणार आहेत.
रेल्वे प्रशासन आणि नागरिकांना होणाऱ्या असुविधामुळे खेद व्यक्त करत प्रवाशांनी रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा असे आवाहन केले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…