ठाणे

Mumbai Local News : मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी साडेपाच तास ट्रान्स हार्बर ठप्प; मेन आणि पश्चिम रेल्वेवरही मेगाब्लॉक

Mumbai Local Train News : ठाणे-वाशी दरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे बंद; कांदिवली-मालाड दरम्यान पश्चिम रेल्वेवरही मोठे बदल

मुंबई | मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी (11 जानेवारी) विविध तांत्रिक कामांसाठी मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/नेरूळ दरम्यान दुपारी सेवा उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागणार आहे.

1.ट्रान्स-हार्बर मार्ग (सर्वात मोठा ब्लॉक)

वेळ: सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत.

परिणाम: ठाणे ते वाशी आणि ठाणे ते नेरूळ दरम्यानची अप व डाऊन सेवा पूर्णपणे रद्द राहील.

डाउन सेवा: ठाणे येथून सकाळी 10.35 ते दुपारी 04.07 पर्यंत वाशी, नेरूळ, पनवेलसाठी एकही गाडी सुटणार नाही.

अप सेवा: पनवेल, नेरूळ, वाशी येथून ठाण्याकडे सकाळी 10.25 ते सायंकाळी 4.09 पर्यंत एकही गाडी येणार नाही.

2.मुख्य मार्ग (सेंट्रल लाईन)
ठिकाण: सीएसएमटी ते विद्याविहार (अप व डाउन धीम्या मार्गावर).

वेळ: सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत.

बदल: सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन धीम्या गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येतील. तसेच घाटकोपरहून सुटणाऱ्या अप धीम्या गाड्या विद्याविहार ते सीएसएमटी दरम्यान अप जलद मार्गावर चालवल्या जातील. या काळात काही स्थानकांवर गाड्या थांबणार नाहीत.

पश्चिम रेल्वे (नाईट आणि डे ब्लॉक)

पश्चिम रेल्वेवर कांदिवली आणि मालाड दरम्यान ‘पॉईंट’ टाकण्याच्या कामासाठी मोठे ब्लॉक घेण्यात आले आहेत:

रात्रीचा ब्लॉक (9-10 जानेवारी): रात्री 11.15 ते पहाटे 4.30 पर्यंत अप आणि डाऊन फास्ट मार्गावर ब्लॉक असेल.

रविवारचा ब्लॉक (11 जानेवारी): कांदिवली-मालाड दरम्यान दुपारी 1.00 ते सायंकाळी 6.30 पर्यंत डाऊन फास्ट मार्गावर आणि दुपारी 1.00 ते 4.00 पर्यंत अप स्लो मार्गावर ब्लॉक राहील. यादरम्यान अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

vivek

Recent Posts