मुंबईठाणे
Trending

Mumbai Local News : मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेचा विशेष ‘मेगाब्लॉक’; कांजूरमार्ग उड्डाणपुलाच्या कामासाठी लोकल रद्द, पाहा वेळापत्रक

Mumbai Local Train News : शनिवार-रविवारच्या मध्यरात्री गर्डर लाँचिंगसाठी पॉवरब्लॉक; जलद मार्गावरून वळवल्या गाड्या, प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता

मुंबई | मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग स्थानकावर कल्याणच्या दिशेला नवीन पादचारी उड्डाणपूलाचे गर्डर बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. 6 मीटर रुंदीचे 4 अवाढव्य गर्डर रोड क्रेनच्या साहाय्याने बसवण्यासाठी रेल्वेने 14 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारीच्या मध्यरात्री विशेष ब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकमुळे उपनगरीय गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून दोन गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत.

रद्द करण्यात आलेल्या लोकल

1.CSMT – ठाणे लोकल (T-1): रविवार 15 फेब्रुवारी रोजी CSMT येथून मध्यरात्री 00.24 वाजता सुटणारी गाडी रद्द.

2.ठाणे – CSMT लोकल (T-2): रविवार 15 फेब्रुवारी रोजी ठाणे येथून पहाटे 04.04वाजता सुटणारी गाडी रद्द.

गाड्यांच्या मार्गात बदल (डायव्हर्शन)

CSMT – कर्जत लोकल (S-1): रविवार 15 फेब्रुवारी रोजी CSMT येथून मध्यरात्री 00.12 वाजता सुटणारी गाडी माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाउन जलद मार्गावरून वळवण्यात येईल.

महत्त्वाची सूचना: ही लोकल वळवण्यात आल्यामुळे ती विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर स्थानकावर थांबणार नाही. त्यामुळे या स्थानकांवर उतरणाऱ्या प्रवाशांनी पर्यायी सोय करावी.

प्रवाशांना आवाहन

कांजूरमार्ग स्थानकातील वाढती गर्दी पाहता 6 मीटर रुंदीचा हा नवीन पूल प्रवाशांसाठी अत्यंत सोयीचा ठरणार आहे. मात्र, या कामासाठी ब्लॉक आवश्यक असल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे आणि घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलचे सुधारित वेळापत्रक तपासून घ्यावे, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0