Mumbai local : रविवारी (22 सप्टेंबर) रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

Mumbai local mega Block : मुंबईत उद्या रविवारी रेल्वेच्या तिन्ही हार्बर, मध्य आणि पश्चिम मार्गावर मेगाब्लॉकघेतला जाणार आहे.
मुंबई :- मुंबई लोकलने प्रवास Mumbai local mega Block करणाऱ्या मुंबईकरांनी घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक बघूनच बाहेर पडा. उद्या रविवारी (22 सप्टेंबर) रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. वेळापत्रक तपासूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केलं आहे. उद्या रविवारी देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी आणि तांत्रिक कारणांमुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात येणार आहे. तसेच काही गाड्या उशीराने धावणार आहे. Mumbai local mega Block
मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे धीम्या मार्गावरील लोकल सेवा मुलुंड – कल्याण दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. या मार्गावरील लोकल ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली स्थानकावर थांबवण्यात येणार आहे. तर ठाकुर्ली, कोपर या स्थानकांत लोकलला थांबा नसेल. Mumbai local mega Block
हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला व वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – पनवेल, बेलापूर, वाशी अप व डाऊन लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तसेच मेगाब्लॉक काळात सीएसएमटी, कुर्ला व पनवेल वाशी या मार्गावर नागरिकांसाठी विशेष लोकल चालवली जाणार आहे. Mumbai local mega Block
पश्चिम रेल्वे मार्गावर गोरेगाव व कांदिवली स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या आणि डाऊन जलद मार्गावर आज मध्यरात्री 12 ते रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत सर्व अप धीम्या मार्गावरील लोकल बोरिवली ते गोरेगावदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तर डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल अंधेरी येथून डाऊन जलद मार्गावर धावणार आहेत. Mumbai local mega Block