Mumbai Local Mega Block: मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर रेल्वेचा “मेगाब्लॉक”, 15 ते 20 मिनिट मध्य रेल्वेच्या लोकल उशिराने
मुंबई :- रविवारी (29 सप्टेंबर) रेल्वेचा मेगा ब्लॉक Mumbai Local Mega घेण्यात येणार आहे. मध्य आणि हार्बर या मार्गांवर दिवसा मेगाब्लॉक आहे.मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत माटुंगा आणि मुलुंडदरम्यान अप आणि डाउन धिम्यामार्गावर, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चुनाभट्टी, वांद्रे स्थानकांदरम्यान सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत अप हार्बर मार्गावर आणि सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत डाउन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनो घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक बघूनच बाहेर पडा. कारण मध्य रेल्वेच्या लोकल सेवा मेगा ब्लॉकमुळे 15 ते 20 मिनिटांनी उशिराने असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.पश्चिम रेल्वेकडून नॉन- इंटरलॉकिंगची कामे करण्यासाठी अंधेरी- गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर शनिवारी रात्रकालीन 10 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत सर्व लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. (Mumbai Mega Block On All Three Railway Lines Some Local Cancelled And Delayed On 29 Sept)
(Mumbai Mega Block On All Three Railway Lines Some Local Cancelled And Delayed On 29 Sept)
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…