मुंबईठाणे
Trending

Bhaskar Jadhav : अवैध मासेमारीवरून भास्कर जाधव आणि नितेश राणे यांच्यात जुंपली! – “चिडायला बाहेर मैदान मोकळं आहे,” भास्कर जाधवांचा नितेश राणेंना सभागृहात थेट टोला

Nitesh Rane And Bhaskar Jadhav : ‘रत्नागिरी-सिंधुदुर्ग परराज्यात आहेत का?’; जाधवांचा खात्याच्या उत्तरावर सवाल; राणेंकडून उत्तरादाखल ‘2014 पूर्वीचे’ संदर्भ आणि 15 स्टील बोटींची घोषणा

नागपूर :- महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांना कोकणातील समुद्रातील अवैध मासेमारीच्या मुद्द्यावरून जोरदार आव्हान दिले. भास्कर जाधव यांनी राणेंना “चिडायला बाहेर मैदान मोकळं आहे, सभागृहात चालत नाही,” अशा शब्दांत खोचक टोला लगावला आणि कोकणात राजकीय जुंपली.

भास्कर जाधव यांनी प्रश्नोत्तराच्या तासात कोकणातील समुद्रात परराज्यातील अवैध बोटींकडून होणाऱ्या मासेमारीचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी मंत्रीमहोदयांना त्यांच्या खात्याच्या उत्तरावरूनच घेरले. त्यांनी विचारले की, “तुमच्या खात्याने एका प्रश्नाच्या उत्तरात, महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमन 1981 सुधारित 2021 नुसार रत्नागिरीत 9 आणि सिंधुदुर्गात 19 अशा परराज्यातील नौकांवर कारवाई केल्याचा उल्लेख केला आहे. यामधून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे परराज्यात आहेत, असा अर्थ ध्वनित होतो. तुमच्या खात्याने यामध्ये सुधारणा करुन घ्यावी.” यावर भास्कर जाधव यांनी नितेश राणेंना उद्देशून चिडण्याबद्दलचा टोला लगावला.

जाधव यांनी केंद्राच्या आणि राज्याच्या एकूण 8 स्पीड बोटी सध्या बंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आणले. परराज्यातील बोटींना पकडणे कठीण असल्याने या बोटी तातडीने सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.

यावर उत्तर देण्यासाठी नितेश राणे उभे राहिले आणि त्यांनी “चिडणे आणि या प्रश्नाचा काही संबंध नाही,” असे म्हणत जाधव यांच्यावर पलटवार केला. त्यांनी “फक्त सगळ्या गोष्टी 2014 पूर्वीच झाल्या, असे म्हणू नये,” असा टोला लगावला. परराज्यातील बोटींकडे हत्यारे असून ते हल्ले करतात. मात्र, यावर उपाय म्हणून 15 स्टीलच्या गस्ती नौका मागवत असून, ड्रोनद्वारेही लक्ष ठेवले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यांनी ‘माझ्या खात्याचे 100 टक्के अधिकारी प्रामाणिक आहेत असे नाही,’ असे स्पष्ट मतही व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0