Indian Navy’s Anti-Piracy Operation : भारतीय नौदलाचे ॲन्टी पायरेसी ऑपरेशन
Indian Navy’s Anti-Piracy Operation : भारतीय नौदलाचे ॲन्टी पायरेसी ऑपरेशन दरम्यान ताब्यात घेतलेले 35 सोमालियन चाच्यांना अटक.
मुंबई :- (23 मार्च) भारतीय नौदलाचे आय.एन.एस. कोलकत्ता या युध्दनौकेचे रेग्युलेटिंग ऑफिसर लेफ्टनंट अजयकुमार यांनी लेखी तक्रार देवुन कळविले की, भारतीय नौदलाकडून समुद्रातून चालणारे व्यापारी जहाज व क्रू मेंबर्स यांची सुरक्षिततेकामी नियमित गस्त करण्यात येत असते. 14 डिसेंबर 2023 ते 16 मार्च 2024 रोजी 1.30 वा. चे दरम्यान पोर्ट गराकेंड, सोमालिया पासुन 260 नौटीकल मैल पुर्वेस अरबी समुद्रात कार्गो जहाज नामे Ex Ruen हे बल्गेरिया देशाचे जहाज कार्गोसह जात असताना त्यातील कार्गो व 17 क्रू मेंबर्स यांना एकूण 35 सोमालियन समुद्री चाच्यांनी आपल्या ताब्यातील 02 बोटीतून कोणतेही वैध पारपत्र अगर इतर कागदपत्रे सोबत न बाळगता, गैरकायद्याची मंडळी जमवून, पूर्व नियोजित कट रचून, आपल्या कब्जातील अवैध अग्निशस्त्राचा वापर करून, यातील मेम्बर यांचे अपहरण केले. तसेच स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी जहाजाचे मालक यांचेकडे कु मेम्बर्स, व जहाज यांच्या मुक्ततेसाठी 60 दशलक्ष अमेरिकन डॉलरची खंडणी मागितली व खंडणी न दिल्यास सर्व क्रू मेंबर्स यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
सदर अपहरित ओलीसांना मुक्त करण्यासाठी व मदतीसाठी पाठविण्यात आलेले भारतीय नौदलाचे युध्द नौका नामे आय. एन. एस. कोलकत्ता वरील भारतीय नौदलाचे अधिकारी व जवानांच्या दिशेने नमूद सोमालियन चाचे यांनी आपल्या ताब्यातील अवैध अग्निशस्त्रातून गोळीबार करून त्यांचे शासकीय कामात अडथळा आणला तसेच भारतीय नौदलाने रेकी करण्याकरीता पाठविलेल्या युध्द नौकेवरील ड्रोनवर गोळीबार करून नुकसान केले असे दिलेल्या तक्रारीवरुन यलोगेट पोलीस ठाणे कलम 307,364(अ), 363,384,353,341,342,344 (अ) 120(ब),143,145,147,148,149,438,427,506,506(2), 34 भादवि सह मेरिटाईम अन्टी पायरसी ॲक्ट 2022 कलम 3,5 सह अनलॉफुल ॲक्टीव्हीटी प्रिव्हेन्शन ॲक्ट कलम 16,20 सह भारतीय हत्यार कायदा कलम 3,25,27 सह पासपोर्ट अधिनियम कलम 3,6 सह परकीय नागरी कायदा कलम 14 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्हयातील आरोपी हे भारतीय नौदलाचे युध्द नौका आय. एन. एस. कोलकत्ता यांनी ॲटी पायरेसी ऑपरेशन दरम्यान ताब्यात घेतलेले एकुण 35 सोमालियन समुद्री चाचे यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. अटक आरोपीना उदईक दिनांक 24 मार्च 2024 रोजी न्यायालयासमक्ष हजर करीत आहोत. तसेच सदर सोमालियन चाचे यांनी गुन्हयात वापरलेले 02 पांढन्या रंगाच्या बोटी, 03 इंजिन, 09 मोबाईल फोन, 196 जिवंत काडतुसे, 01 खाली केस, 01 चाकू, 01 सोनी कॅमेरा, 01 सोमालियन देशाचा पासपोर्ट, 02 बल्गेरिया पासपोर्ट, ओळखपत्रे व इतर कागदपत्रे जप्त करण्यात आले आहेत.
पोलीस पथक
पोलीस सह आयुक्त (का व सु), बृहन्मुंबई,अपर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग,पोलीस उप आयुक्त, बंदर परिमंडळ, सहाय्यक पोलीस आऊ, यलोगेट विभाग,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यलोगेट पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी माया मोरे व तपास पथक यांनी केली आहे.