Mumbai Vinoba Bhave Nagar Police Station Latest News : 1.70 लाखांचे वाहन हस्तगत; विनोबा भावे नगर पोलिसांची मोठी कामगिरी
मुंबई | विनोबा भावे नगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोटार वाहन चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास अटक करून तब्बल तीन गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश मिळवले आहे. Mumbai Vinoba Bhave Nagar Police Station Latest News अटकेतील आरोपीकडून एकूण 1.70 लाख रुपये किमतीची वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. Mumbai Latest crime News
दि. 28 मे रोजी रात्रीच्या सुमारास दीपक साहू (वय 22) या रिक्षाचालकाने आपली ॲटोरिक्षा कुर्ला पश्चिम येथील एचडीआयएल इमारतीसमोरील परिसरात पार्क केली होती. मात्र काही वेळातच त्याची रिक्षा चोरीला गेल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून विनोबा भावे नगर पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मोहम्मद सगीर अब्दुल मजीद सिद्दिकी उर्फ मॅगी (वय 27) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून चोरी गेलेली ॲटोरिक्षा व इतर दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली. या कारवाईमुळे कुर्ला परिसरात वाहनचोरी करणाऱ्या टोळक्यांना चांगलाच आळा बसणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपीविरोधात पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती , सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने , मध्य प्रादेशिक विभाग, मुंबई, पोलीस उप आयुक्त गणेश गावडे , सहाय्यक पोलीस आयुक्त कुर्ला विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र श्रीरसागर, पोलीस निरीक्षक गुन्हे शिवानंद देवकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमर चेडे, पोलीस हवालदार गांगुर्डे, गवारे पोलीस शिपाई सांगळे, महाजन, विशे, उगले यांनी केली आहे.
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…
•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…
Sanjay Raut On MVA : राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआची रणनीती | 'मुंडवा जमीन घोटाळा' अद्याप…